चालत्या बसमध्ये सफरचंदाची साल काढणारा चालक निलंबित

चीनमध्ये एका ड्रायव्हरने आणखी मोठा पराक्रम केला आहे.

Updated: Jul 17, 2017, 08:46 PM IST

बिजिंग : आपल्या देशात बस चालक मोबाईलवर बोलत असल्याने अपघात वाढले आहेत, यामुळे अपघात होत आहेत. मात्र चीनमध्ये एका ड्रायव्हरने आणखी मोठा पराक्रम केला आहे. हा ड्रायव्हर बस चालवत असताना सफरचंदाची साल काढत होता. विशेष म्हणजे बस देखील वेगात होती. या ड्रायव्हरचा असा हा स्टंट एका प्रवाशाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला, यानंतर हा व्हिड़ीओ व्हायरल झाला, यावर टीका वाढत असल्याने, या ड्रायव्हरलाही नंतर कामावरून काढून टाकण्यात आले.