बालदिनानिमित्त कंडोम कंपनीने दिल्या हटके शुभेच्छा, सोशल मीडियात ट्रोल

14 नोव्हेंबर हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांचा जन्मदिन. जो बालदिन म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी देशभरातून बालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र, एका कंडोम कंपनीने दिलेल्या हटके शुभेच्छा मात्र, लक्षवेधी ठरल्या. सोशल मीडियावरही या शुभेच्छा चांगल्याच ट्रोल झाल्या.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 14, 2017, 11:23 PM IST
बालदिनानिमित्त कंडोम कंपनीने दिल्या हटके शुभेच्छा, सोशल मीडियात ट्रोल
छायाचित्र सौजन्य: ट्विटर

नवी दिल्ली : 14 नोव्हेंबर हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांचा जन्मदिन. जो बालदिन म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी देशभरातून बालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र, एका कंडोम कंपनीने दिलेल्या हटके शुभेच्छा मात्र, लक्षवेधी ठरल्या. सोशल मीडियावरही या शुभेच्छा चांगल्याच ट्रोल झाल्या.

कोणत्या कंपनीने दिल्या शुभेच्छा?

सुरूवातीच्या काळात बालदीन हा 20 नोव्हेंबरला साजरा केला जात असे. मात्र, पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर मात्र हा दिवस 14 नोव्हेंबरला साजरा केला जाऊ लागला. दरम्यान, ड्यूरेक्स या कंडोम कंपनीनेही बालदिनानिमित्त आज शुभेच्छा दिल्या. शुभेच्चा देताना या कंपनीने एक हटके फोटो वापरला आणि त्यासोबत हॅप्पी चिल्ड्रन डे असा संदेशही दिला.

काय होता फोटो?

ड्युरेक्सने शुभेच्छा देताना वापरलेला फोटो असा होता की, कंडोमच्या एका पाकीटाला लॉलिपॉपसारखे बनवून पोस्ट करण्यात आले होते. महत्त्वाचे असे की, लॉलिपॉप मुलांना फारच आवडते. त्यामुळे बालदिनानिमित्त कंडोम कंपनीने दिलेल्या शुभेच्छा पाहताच नेटीझन्सनी हा फोटो चांगलाच ट्रोल केला.

नोटीझन्सनी दिल्या मजेशीर प्रतिक्रीया

हा फोटो पाहून काही लोकांनी मोठ्या मजेशीर प्रतिक्रीया दिल्या. काहींचे म्हणने असे की, कंडोम कंपनीने अशा प्रकारे शुभेच्छा देणे योग्य नाही. कारण कंडोम वापरला तर, मुलेच जन्माला येणार नाही.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close