फेसबूकचे 'डिस्लाइक' ऐवजी 'डाऊनवोट'

सोशल मीडियामध्ये आघाडीवर असणाऱ्या फेसबूकने आपले नवी फीचर्स आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. 'डिस्लाइक' बटना ऐवजी आता 'डाऊनवोट' हे बटन आणणार आहे. तसे संकेत मिळत आहेत.

Updated: Feb 9, 2018, 03:46 PM IST
फेसबूकचे 'डिस्लाइक' ऐवजी 'डाऊनवोट'

मुंबई : सोशल मीडियामध्ये आघाडीवर असणाऱ्या फेसबूकने आपले नवी फीचर्स आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. 'डिस्लाइक' बटना ऐवजी आता 'डाऊनवोट' हे बटन आणणार आहे. तसे संकेत मिळत आहेत.

 'डिस्लाइक' बटणाशी साधर्म्य साधणारे  'डाऊनवोट' (Downvote)हे बटण लवकरच फेसबूक युजर्सना वापरता येणार आहे. या बटणाची सध्या चाचणी केली जात आहे. 

अमेरिकेतले युजर्स पब्लिक पेजच्या पोस्टवरील कॉमेंट्ससाठी 'डाऊनवोट' हा पर्याय निवडत आहेत.  फेसबूकच्या प्रवक्त्याने सांगितलेय, आम्ही डिस्लाइक बटणाची चाचणी करत नाही. आम्ही लोकांसाठी एका अशा फीचरची चाचणी घेत आहोत, ज्यामुळे लोकांना पब्लिक पेज पोस्टवर येणाऱ्या कॉमेंट्सवर आपली प्रतिक्रिया देता येईल. 

फेसबूकने डाऊनवोट बटणासाठी स्वतंत्र आयकॉन दिलेला नसेल. प्रत्येक कमेंटच्या खाली एक पर्याय म्हणून तो दिसेल. हा पर्याय निवडताच फेसबूक प्रतिक्रीया डाऊनवोट करण्याचं कारण विचारेल. या कारणांमध्ये आक्षेपार्ह, गैरसमज पसरवणारी आणि विषयाचा संदर्भ सोडून केलेली प्रतिक्रिया असे पर्याय असतील.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close