फ्लिपकार्टने लाँच केला पहिला स्मार्टफोन Billion Capture+

प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर आतापर्यंत इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनची विक्री केली जात होते. मात्र आता फ्लिपकार्टने स्वत:चा स्मार्टफोन बाजारात आणलाय. कंपनीने बिलियन कॅप्चर+(Billion Capture+) या नावाने स्मार्टफोन लाँच केलाय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 10, 2017, 04:55 PM IST
फ्लिपकार्टने लाँच केला पहिला स्मार्टफोन Billion Capture+

मुंबई : प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर आतापर्यंत इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनची विक्री केली जात होते. मात्र आता फ्लिपकार्टने स्वत:चा स्मार्टफोन बाजारात आणलाय. कंपनीने बिलियन कॅप्चर+(Billion Capture+) या नावाने स्मार्टफोन लाँच केलाय.

या स्मार्टफोनला कंपनीने मेड फॉर इंडिया ब्राँडिंगअंतर्गत लाँच केलाय. फोनची विक्री १५ नोव्हेंबरपासून सुरु केली जाणार आहे. 

फोनचे फीचर्स

१५ नोव्हेंबरपासून विक्री केल्या जाणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा देण्यात आलाय. या फोनमध्ये ३५०० एमएएच इतकी दमदार बॅटरी आहे. तसेच यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर आहे. 

प्रोसेसर आणि रॅम

फ्लिपकार्टचा नवा फोन ओक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसरवर चालतो. यात ३ जीबी आणि ४ जीबी रॅमच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ३२ जीबी आणि ६४ जीबी पर्यायात हा फोन उपलब्ध आहे. तसेच मेमरी कार्डच्या मदतीने तुम्ही १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवू शकता. 

कॅमेरा 

फ्लिपकार्टच्या या फोनमध्ये ड्युअल कॅमेऱ्याची सुविधा देण्यात आलीये. यात १३ एमपी रेयर कॅमेरा तर ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय.

बॅटरी 

कंपनीच्या या फोनमध्ये भविष्यात अँड्रॉईड ओरियो अपडेट होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. यात ३५०० एमएएच बॅटरी आहे. १५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये सात तासापर्यंत बॅटरी लाईफ मिळेल. तसेच एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर दोन दिवसांपर्यत बॅटरी चालणार असल्याचा दावा कपंनीने केलाय.

किंमत 

फ्लिपकार्टच्या ३२ जीबी मेमरीच्या फोनची किंमत १०,९९९ रुपये आणि ६४ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत १२,९९९ रुपये आहे.