गुगलकडून डूडल बनवून राजा राम मोहन रॉय यांना आदरांजली

रॉय यांनी केवळ समाजातील वाईट प्रथा, परंपरांविरूद्ध जोरदार आवाज उठवला. ज्यात बालविवाह, जाती व्यवस्था, बालहत्या, निरक्षरता आदी गोष्टींचा समावेश आहे.

Updated: May 22, 2018, 10:19 AM IST
गुगलकडून डूडल बनवून राजा राम मोहन रॉय यांना आदरांजली title=

मुंबई : भारतात सती प्रथेविरूद्ध आवाज उठवून ती बंद करण्यासाठी सरकारला भाग पाडणारे थोर समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांची आज (२२ एप्रिल) २४६वी जयंती. दरम्यान, जयंतीचे औचित्य साधून इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने डूडल बनवून रॉय यांच्या प्रती आपला आदर व्यक्त केला आहे. राजा राम मोहन रॉय यांनी सती प्रथेविरूद्ध आवाज तर उठवलाच. पण, त्याशिवायही समाजातील इतर अनेक अनिष्ठ गोष्टींविरोधातही मोठे कार्य केले.

समाजाला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणारे कार्य

आजचे डूडल काहीसे हटके आहे. हे डूडल बीना टोरंटोचे डिजायनर आहे. गूगलने डूडलमध्ये राजा राम मोहन रॉय यांनी हाता पुस्तक घेतलेले दाखवले आहे. तसेच, त्यांच्या आजुबाजूला इतर लोकही उपस्थित असल्याचे दिसते. रॉय यांचे आधुनिक भारताच्या इतिसाहासात मोठे योगदान आहे. १९व्या शतकात भारतावर इंग्रजांचे राज्य होते. या काळातही त्यांनी भारतीय समाजाला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणारे उत्तुंग कार्य केले. ज्याचा परिणाम समाजबदलात झाला.

समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध उठवला आवाज

दरम्यान, रॉय यांनी केवळ समाजातील वाईट प्रथा, परंपरांविरूद्ध जोरदार आवाज उठवला. ज्यात बालविवाह, जाती व्यवस्था, बालहत्या, निरक्षरता आदी गोष्टींचा समावेश आहे.