बिनचूक इंग्रजी लिहायला 'गूगल' करणार मदत

इंग्रजी ही मूळ भाषा नसणार्‍यांमध्ये अनेकदा इंग्रजीत लिहण्याचा आत्मविश्वास नसतो. 

Updated: Jul 25, 2018, 07:26 PM IST
बिनचूक इंग्रजी लिहायला 'गूगल' करणार मदत  title=

सॅन फ्रान्सिस्को : इंग्रजी ही मूळ भाषा नसणार्‍यांमध्ये अनेकदा इंग्रजीत लिहण्याचा आत्मविश्वास नसतो. काही लहान सहान चूकांमुळे त्यांचा आत्मविश्वास ढगमगतो. आता इंग्रजीचं व्याकारण आणि स्पेलिंग चूका टाळण्यासाठी गूगलची नवीन सेवा फायदेशीर ठरणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, नव्या ग्रामर टूलमुळे लिखाणातील चूका गूगल डॉक्युमेंटमध्ये निळया रेषेत दाखवल्या जाणार आहेत. हे अ‍ॅप्लिकेशन लवकरच विकसित केले जाणार आहे. 

डॉक्युमेंटमध्ये दाखवल्या जाणार चूका 

पूर्ण डॉक्युमेंट टाईप केल्यानंतर युजरचा चूका दाखवल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यामध्ये बदल करण्याची अनुमती दिली जातील. गूगलने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामर चेकर हा स्पेल चेकर आणि नॅचरल लॅग्वेज सर्च फीचरसोबत काम करणार आहे. त्यामुळे वेळेनुसार या टूलमध्येही  बदल केले जाणर आहेत. 

AI  द्वारा व्हर्च्युअल एजेंट्स कॉल सेंटरमध्ये काम करतील 

गूगलने केलेल्या घोषणेनुसार, सिस्को आणि जेनिसिससमवेत अनेक साथीदार कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच AI ची निर्मिती करणार आहे. जे कॉल सेंटरमध्ये लोकांऐवजी काम करणार आहेत. या सॉफ्टवेअरला 'कॉन्टेक्स सेंटर एआय' असे संबोधले जाते.