होंडाची नवी 'ऐकॉर्ड' पाहिलीत का?

येत्या काळात 'मोस्ट अवेटेड' कार असतील तर त्यात सर्वात वरचा क्रमांक असेल होंडाच्या 'ऐकॉर्ड'चा... लवकरच ही कार भारतात लॉन्च होणार आहे. 

Updated: Jul 15, 2017, 07:01 PM IST
होंडाची नवी 'ऐकॉर्ड' पाहिलीत का? title=

मुंबई : येत्या काळात 'मोस्ट अवेटेड' कार असतील तर त्यात सर्वात वरचा क्रमांक असेल होंडाच्या 'ऐकॉर्ड'चा... लवकरच ही कार भारतात लॉन्च होणार आहे. 

होंडाच्या अत्यंत लोकप्रिय अशा कारपैंकी एक कार असलेली 'ऐकॉर्ड' अनेक बदलांसहीत यूएसमध्ये लॉन्च करण्यात आलीय. नव्या रुपात ही गाडी पहिल्यापेक्षा जास्त स्मार्ट, स्टायलिश आणि मजबूत झालीय. 


होंडा ऐकॉर्ड

ऐकॉर्डचे हे रुप अगोदरच्या रुपापेक्षा शॉर्ट आणि कॉम्पॅक्ट आहे. परंत, यात लांबलचक वीलबेस दिला गेलाय. सी-शेप्ड एलईडी, लोअर सिटिंग पोझिशन, मोठा लेगरूम आणि जास्त बूट स्पेस यामध्ये तुम्हाला मिळेल. 


होंडा ऐकॉर्ड

 

ऐकॉर्ड ६००० आरपीएम वर २५० बीएचपीची पॉवर आणि ३७० एनएम टॉर्क जनरेट करते. यामध्ये तुम्हाला नॉर्मल आणि स्पोर्ट अशा दोन ड्रायव्हिंग मोडमध्ये मिळेल. याशिवाय अॅड ऑन फिचर्समध्ये ट्रान्समिशन कॅलिब्रेशन, थ्रॉटल मॅप, कॉलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टम, लेन डिपर्चर वॉर्निंग, रोड डिपर्चर मिटिगेशन, अॅडप्टिव्ह क्रूज कन्ट्रोल आणि ब्लाईंड स्पोर्ट मॉनिटरिंग यांचा समावेश आहे..


होंडा ऐकॉर्ड

यूएसमध्ये या दहाव्या जेनरेशनची कार डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे. परंतु, भारतात मात्र या कारची एन्ट्री होण्यासाठी २०१८ शेवटाची वाट पाहावी लागणार आहे.