होंडाने २३ हजार कार पुन्हा माघारी मागविल्या

होंडा कंपनीने आपल्या जवळपास २३ हजार कार पुन्हा माघारी बोलविल्यात आलेत. कारमध्ये काही त्रुटी राहिल्याने या कार माघारी मागविल्या आहेत.

Updated: Jan 20, 2018, 10:46 PM IST
होंडाने २३ हजार कार पुन्हा माघारी मागविल्या title=

 नवी दिल्ली : होंडा कंपनीने आपल्या जवळपास २३ हजार कार पुन्हा माघारी बोलविल्यात आलेत. कारमध्ये काही त्रुटी राहिल्याने या कार माघारी मागविल्या आहेत.

होंडा कार्स इंडियाकडून एअरबॅग्स्मध्ये काही त्रुटी सापडल्या आहेत. त्यामुळे कंपनीने आपली २२,८३४ वाहने परत बोलाविली आहेत. 

कंपनीने मागविलेल्या कारमध्ये अॅकॉर्ड, सिटी आणि जाझ मॉडेल्सचा समावेश आहे. या कारचे २०१३ मध्ये उत्पादन घेण्यात आले आहे. या मॉडेल्सच्या कार दुरूस्तीसाठी परत बोलाविण्यात आल्यात. 

यामध्ये सिटी मॉडेलमधील २२,०८४ युनिट्स, प्रिमियम सेडान अकॉर्डची ५१० युनिट्स आणि जाझच्या २४० युनिट्सचा समावेश आहे. कंपनीकडून देशभरातील वितरकांकडून ही सेवा मोफत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

तकाटा या कंपनीकडून उत्पादन घेण्यात आलेल्या एअरबॅग्स्मध्ये दुरुस्ती असल्याचे गेल्या वर्षी निदर्शनात आले होते. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कंपनीने ४१,५८० युनिट्सना रिकॉल केले होते.  जपानच्या टकाता कॉर्पोरेशनकडून नादुरुस्त एअरबॅग बनविण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील लाखो वाहनांना माघारी  बोलविण्यात आले आहे. भारतासाठी ही संख्या ३.१३ लाख युनिट्स आहे.