खुशखबर! iPhone 8 लॉन्चमुळे जुन्या आयफोनच्या किंमतीत मोठी कपात

अ‍ॅपल कंपनीने त्यांचे तीन नवीन दमदार आयफोन लॉन्च केले आहेत. हे फोन लवकरच भारतात उपलब्ध होतील. कंपनीने एकत्र iPhone X, iPhone 8 आणि iPhone 8 प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

Updated: Sep 13, 2017, 10:41 PM IST
खुशखबर! iPhone 8 लॉन्चमुळे जुन्या आयफोनच्या किंमतीत मोठी कपात

नवी दिल्ली : अ‍ॅपल कंपनीने त्यांचे तीन नवीन दमदार आयफोन लॉन्च केले आहेत. हे फोन लवकरच भारतात उपलब्ध होतील. कंपनीने एकत्र iPhone X, iPhone 8 आणि iPhone 8 प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

नेहमीप्रमाणे नवे आयफोन्स आल्याने जुन्या आयफोन्सची किंमत कमी करण्यात आली आहे. अ‍ॅपलने आयफोन ६ एस, आयफोन ६ एस प्लस, आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लसच्या किंमतींमध्ये मोठी कपात केली आहे. त्यामुळे ज्यांना नवीन अयफोन घेणे परवडणार नाही ते आयफोनच्या जुन्या मॉडल्सकडे पर्याय म्हणून बघू शकतात. 

iPhone 6s ची नवीन किंमत - 

आयफोन ६ एस ३२ जीबी आणि १२८ जीबी व्हेरिएंट आतापर्यंत अनुक्रमने ४६ हजार ९०० रूपये आणि ५५ हजार ९०० रूपयांमध्ये उपलब्ध होते. या फोनच्या किंमतीत आता कपात करण्यात आल्याने हे फोन्स अनुक्रमे ४० हजार रूपये आणि ४९ हजार रूपयांना मिळतील. या मॉडल्सवर ६ हजार ९०० रूपयांची कपात करण्यात आली आहे. 

iPhone 6s Plus ची नवी किंमत -

आयफोन ६ एस प्लसच्या ३२ जीबी व्हेरिएंट आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत आधी ५६ हजार १०० रूपये आणि ६५ हजार रूपये इतकी होती. आता या फोनची किंमत ४९ हजार रूपये आणि ५८ हजार रूपये इतकी करण्यात आली आहे. या दोन्ही मॉडल्सवर ६ हजार ९०० रूपयांची सूट देण्यात आली आहे. 

iPhone 7 ची नवीन किंमत -

आयफोन ७ चं ३२ जीबी व्हेरिएंट आता ४९ हजार रूपयांमध्ये तुम्ही घेऊ शकता. हे मॉडल आतापर्यंत ५६ हजार २०० रूपयांना विकलं जात होतं. तर १२९ जीबी व्हेरिएंट आता ५८ हजार रूपयांमध्ये मिळणार आहे. याची किंमत आधी ६५ हजार २०० रूपये इतकी होती. 

iPhone 7 plus ची नवीन किंमत -

आयफोन ७ चं ३२ जीबी व्हेरिएंट आणि १२८ जीबी व्हेरिएंत आतापर्यंत अनुक्रमे ६७ हजार ३०० रूपये आणि ७६ हजार २०० रूपयांना मिळत होते. किंमती घटवण्यात आल्यानंतर आता हे फोन अनुक्रमे ५९ हजार रूपये आणि ६८ हजार रूपयांना मिळणार आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close