iPhone Price Cut: iPhone 7 आणि iPhone 8 ची किंमत घसरली

जर तुम्ही iPhone खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी खुश खबर आहे. Apple ने बुधवारी रात्री २ मोठ्या मॉडेलच्या किंमतीत कपात केली आहे.

Updated: Sep 13, 2018, 04:53 PM IST
iPhone Price Cut:  iPhone 7 आणि iPhone 8 ची किंमत घसरली

मुंबई : जर तुम्ही iPhone खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी खुश खबर आहे. Apple ने बुधवारी रात्री २ मोठ्या मॉडेलच्या किंमतीत कपात केली आहे. आयफोनने आज ३ नव्या आयफोनच्या मॉडेल्सचं लॉन्चिंग केल्यानंतर. iPhone7 आणि iPhone 8 च्या किमतीत कपात केली आहे.

याशिवाय iPhone7 आणि iPhone 8 च्या दरातही कपात करण्यात आली आहे. अॅपलने iPhone च्या या मॉडेलची किंमत १०० डॉलरने घटवली आहे, म्हणजेच जवळ-जवळ ७ हजार २०० रूपयांनी ही किंमत कमी झाली आहे.

आता  iPhone 7 ची किंमत 549 डॉलरच्या बदल्यात 449 डॉलर म्हणजेच ३२ हजार ३२८ रूपये असेल. तसेच iPhone 7 Plus आता 569 डॉलर म्हणजेच ४० हजार ९६८ रूपयांना मिळेल. याच प्रमाणे iPhone 8 ची किंमत घटलीय, आता तो फोन 599 डॉलर म्हणजे ४३ हजार १२८ रूपयांना मिळणार आहे. iPhone 8 Plus ची किंमत 699 डॉलर म्हणजेच 50 हजार 328 रूपये असेल.

वरील किंमती या अमेरिकेत कमी झालेल्या आहेत, भारतातबद्दल लवकरच यासारखा बदल होण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेत ज्या प्रकारे या फोन्सची किंमत कमी झाली आहे, त्या प्रमाणे भारतात ही किंमत वरील प्रत्येक मॉडेलमागे १० हजाराने कमी होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत या फोनची किंमत जास्त आहे, कारण यात डिलरचं कमिशन असतं असं सांगतात. तसेच निर्यात शुल्क देखील असतो. भारतात iPhone 8 plus च्या 256 जीबी मॉडल ची किंमत 86 हजार रूपये आहे. iPhone 8 चा 256 जीबीचं मॉडल 77,000 रुपए मिळतोय, तर iPhone 8 - 64 जीबी मॉडलची किंमत अजून ६४ हजार रूपये आहे. iPhone 7 / 32 जीबी मॉडलची किंमत 43,000 हजार रूपये आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close