होम बटन नसलेल्या iPhone XR चे फिचर्स

जाणून घ्या फिचर्स 

होम बटन नसलेल्या iPhone XR चे फिचर्स

मुंबई : अॅपलचा दुसरा नवीन फोन iPhone XR (10R) लाँच केलं आहे. 6.1 इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले यामध्ये देण्यात आलं असून यामुळे डस्ट आणि लिक्विडपासून सुरक्षित राहणार आहे. महत्वाचं म्हणजे iPhone XR मध्ये होम बटन नाही. या स्मार्टफोनला चालवण्यासाठी हेप्टिक टच नावाचा फिचर देण्यात आला आहे. यामध्ये सिंगल रिअर कॅमेरा देण्यात आला असून XR मध्ये अॅडवान्स Bokeh टेक्नॉलॉजीसोबत 12 एमपीचा सिंगल कॅमेरा असणार आहे. 

अशी असणार किंमत 

अॅपलने iPhone XR Max चे दर 1099 डॉलर जवळपास 80 हजार रुपये असून iPhone XS 999 डॉलर जवळपास 72 हजार रुपये आहे. iPhone XR 749 डॉलर म्हणजे 54 हजार रुपये आहेत. या तिन्ही आयफोनची विक्री 28 सप्टेंबर रोजी भारतात 21 देशांमध्ये लाँच होणार आहे. अॅपलने iPhone 7 आणि iPhone 8 चे दर कमी करण्यात आला आहे. iPhone XR स्मार्टफोन अॅपलच्या फ्लॅगशिप XS आणि XS Max मधील हे हँडसेट आहे. यामध्ये 6.1 इंच एलसीडी लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. स्क्रीनची डेनसिटी 326 पीपीआय आहे. 

आयफोनमध्ये एचडीआर डिस्प्ले नाही. पिक्सल डेनसिटी कमी करण्यात आली आहे. XS वेरिएंटची तुलनात डिस्प्ले कमी आहे. आयफोन XR मध्ये ड्यूअल रिअर कॅमेरा सेटअप नाही आहे. या डिवाइसमध्ये अॅपलने 12 मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा देण्यात आलं आहे. 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 749 डॉलर जवळपास 53,900 रुपये आहे. तर 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 899 डॉलर जवळपास 57,500 रुपये आहे. 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 899 डॉलर म्हणजे जवळपास 64,700 रुपये किंमत आहे. XR लाँच पुढच्या महिन्यात 19 ऑक्टोबर पासून प्री बुकिंग सुरू होणार असून 26 ऑक्टोबरमध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close