जपानने भारतात लाँच केली जबरदस्त कार

जपानची प्रसिद्ध कार कंपनी लेक्ससने भारतात आपली लग्जरी कार LS 500h लाँच केली आहे. लेक्ससचा 500h सोबतचा भारतात येणारं हे पाचवं प्रोडक्‍ट आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 15, 2018, 03:38 PM IST
जपानने भारतात लाँच केली जबरदस्त कार title=

नवी दिल्ली : जपानची प्रसिद्ध कार कंपनी लेक्ससने भारतात आपली लग्जरी कार LS 500h लाँच केली आहे. लेक्ससचा 500h सोबतचा भारतात येणारं हे पाचवं प्रोडक्‍ट आहे.

किती आहे कारची किंमत

भारतात या कारची एक्स शो रूम किंमत 1.77 कोटी आहे. या कार 2 वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. ही एक स्टाईलस सिडेन आहे. ज्यामध्ये शार्प कॅरेक्टर लाइन्स, एलईडी हेडलॅम्प्स आणि 20 इंचचे अलॉय व्हिल या सारखे फीचर आहेत. या गाडीचा प्रीमियम लुक आहे. यामध्ये एयर सस्पेंशन देण्यात आलं आहे. ही हायब्रिड फॉर्मवर उपलब्ध होईल. या कारमध्ये वी6 पेट्रोल हायब्रिड यूनिट देण्यात आलं आहे.

कोणाची आहे स्पर्धा

कंपनीने आतापर्यंत लाँच केलेल्या कारमध्ये LS 500h ही हायब्रिड कार आहे. या कारने २०१७ मध्ये डेट्रॉयट मोटर शोमध्ये डेब्यू केलं होतं. कंपनीच्या LS 500h या कारची स्पर्धा BMW 7 सीरीज, मर्सेडीज, ऑडीच्या लग्‍जरी गाड्यासोबत आहे. BMW 7 सीरीजची सुरुवात 1.47 कोटींपासून होते.