आता जिओ यूजर्सला १ वर्ष फ्री मिळणार ही सर्व्हिस

मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी आणखी एक सरप्राईज घेऊन आलीये. कंपनीने इरोस इंटरनॅशनलसोबत आपला करार रिन्यू केलाय. या करारामुळे इरोजचा डिजीटल कंटेट देशातील सर्व जिओ ग्राहकांना मिळणार आहे.

Updated: Jan 22, 2018, 09:02 AM IST
आता जिओ यूजर्सला १ वर्ष फ्री मिळणार ही सर्व्हिस title=

मुंबई : मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी आणखी एक सरप्राईज घेऊन आलीये. कंपनीने इरोस इंटरनॅशनलसोबत आपला करार रिन्यू केलाय. या करारामुळे इरोजचा डिजीटल कंटेट देशातील सर्व जिओ ग्राहकांना मिळणार आहे.

या कंटेटमध्ये फुल लेन्थ मूव्ही, थीम बेस्ड प्लेलिस्ट आणि सिनेमांसाठी मल्टी लॅग्वेज सबटायटल, म्युझिक व्हिडीओ प्लेलिस्ट, रिजनल लॅग्वेज फिल्टर्स, व्हिडीओ प्रोग्रेशनसारख्या फीचर्सचा समावेश आहे. 

एअरटेलनेही लाँच केली मेंबरशिप

टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलनेही १ वर्षासाठी अमेझन प्राईम मेंबरशिप फ्री देण्याची घोषणा केली होती. एअरटेलच्या अमेजन प्राईम मेंबरशिपमध्ये युजर्स अनलिमिटेड सिनेमांची मजा घेऊ शकतात. याशिवाय म्युझिक व्हिडीओ प्लेलिस्ट, रिजनल लँग्वेज फिल्टर्स, व्हिडीओ प्रोग्रेशनसारख्या फीचर्सचा समावेश आहे. 

काय आहे एअरटेलची अमेझन प्राईम ऑफर

एअरटेलने आपल्या युजर्सला अशाच प्रकारे अमेझन प्राईम व्हिडीओ एक वर्षासाठी फ्रीमध्ये सब्सक्रिप्शन मिळवण्याची ऑफर लाँच केलीये. या ऑफरनुसार एअरटेल युजर्स अमेझन प्राईम व्हिडीओच्या माध्यमातबन एक वर्षांपर्यंत फ्रीमध्ये सिनेमा तसेच व्हिडीओ पाहू शकतात. अमेझन मेंबरशिपसाठी अमेझन कस्टमर्सना ९९९ रुपये खर्च करावे लागतील. 

जिओफोन वर मिळतोय हा फायदा

रिलायन्स जिओने नुकतेच आपले प्रीपेड प्लान अपग्रेड केलेत. यात १५३ रुपयांच्या प्रीपेड पॅकमध्ये आता दिवसाला १ जीबी ४जी हायस्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दिवसाला १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत.