जिओची मोठी ऑफर: दररोज १ जीबी डेटा फ्री

रिलायंस जिओने पुन्हा एकदा नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड एसएमएस देखील मिळणार आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 4, 2017, 05:01 PM IST
जिओची मोठी ऑफर: दररोज १ जीबी डेटा फ्री title=

मुंबई : रिलायंस जिओने पुन्हा एकदा नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड एसएमएस देखील मिळणार आहे.

जिओची ऑफर

जिओचा हा प्लान त्या कस्टमर्ससाठी आहे जे श्याओमीचा रेडमी ५ए खरेदी करणार आहेत. जिओच्या या प्लानची वॅलिडिटी २८ दिवस आहे. मार्केटमध्ये सध्या हा सर्वात स्वस्त प्लान आहे. जर तुम्ही रेडमी ५ए खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हा प्लान मिळणार आहे.

१२ महिने मिळणार ऑफर

या ऑफरसाठी रेडमी घेणाऱ्या युजरला १२ महिने १९९ च्या रिचार्जवर हा प्लान मिळणार आहे. हा प्लान 5 डिसेंबर पासून 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत असणार आहे. कस्टमर्सला कॅशबॅक वाउचर्समध्ये 100-100 रुपयांचे 10 वाउचर मिळतील. हे कस्टमरच्या अकाउंटमध्ये ट्रांसफर केले जातील.

श्याओमीचा फोनवर डिस्काउंट 

हा फोन खरीदी करण्यासाठी श्याओमी देखील 1 हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. ही ऑफर त्या 5 मिलियन कस्टमर्ससाठी आहे जे 2GB RAM/16GB ROM वाल्या वेरिएंटला खरेदी करतील. यामुळे फोनची किंमत 4,999 रुपये होते. या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी रोमवाले वेरिएंटची किंमत 6,999 आहे.