अखेर जिओ फोन या तारखेला दाखल होणार

रिलायन्सचा जिओ फोन कधी दाखल होणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे, अखेर जिओचा फोन बाजारात दाखल होण्याचा मुहूर्त ठरला आहे.मात्र जिओ फोन खरेदी करणाऱ्यांच्या अडचणी वाढतच आहेत. 

Updated: Sep 1, 2017, 06:58 PM IST
अखेर जिओ फोन या तारखेला दाखल होणार title=

मुंबई :  रिलायन्सचा जिओ फोन कधी दाखल होणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे, अखेर जिओचा फोन बाजारात दाखल होण्याचा मुहूर्त ठरला आहे.मात्र जिओ फोन खरेदी करणाऱ्यांच्या अडचणी वाढतच आहेत. अगोदर प्री बुकिंग थांबवण्यात आली आणि आता ज्यांनी फोन बुक केला आहे, त्यांना हा फोन मिळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

जिओ फोन दिल्ली-एनसीआरच्या स्टोअर्समध्ये २४ सप्टेंबरपर्यंत दाखल होणार आहे. त्यानंतर २५ सप्टेंबरपासून या फोनची शिपिंग सुरु केली जाईल. यापूर्वी जिओ फोनची डिलिव्हरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार होती. मात्र ही तारीख कंपनीने आता पुढे ढकलून, जिओ फोनची शिपिंग आता २५ सप्टेंबरपासून सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे.

 या फोनला जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे शिपिंग तारीख वाढवण्यात आली. या फोनची प्री बुकिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. जिओ फोन दिल्ली-एनसीआरच्या स्टोअर्समध्ये २४ सप्टेंबरपर्यंत दाखल होणार आहे. त्यानंतर २५ सप्टेंबरपासून या फोनची शिपिंग सुरु केली जाईल.

 तुमच्या परिसरातील जिओ स्टोअरमधून तुम्ही बुक केलेला जिओ फोन मिळणार आहे. हा फोन जेव्हा तुमच्या जवळच्या जिओ स्टोअरमध्ये येईल, तेव्हा ग्राहकाला कंपनीकडून मेसेजद्वारे माहिती दिली जाईल.

रिलायन्सने २४  सप्टेंबर रोजी  जिओ फोनची बुकिंग सुरु केली. मात्र बुकिंग सुरु होताच ग्राहकांच्या या फोनवर उड्या पडल्या. परिणामी जिओची वेबसाईट अनेकदा क्रॅश झाली.

मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने जिओ फोनची बुकिंग आता थांबवली आहे. बुकिंग कधीपासून सुरु होईल, ते लवकरच कळवलं जाईल, असं कंपनीच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.

दरम्यान ज्यांना फोन खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यांनी नाराज होण्याची गरज नाही. कारण बुकिंग पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. केवळ हा फोन हातात पडण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्तीची वाट पाहावी लागणार आहे.

जिओ फोन बुक करताना तुम्हाला 500 रुपये द्यायचे आहेत आणि फोन घेताना उर्वरित एक हजार रुपये द्यावे लागतील. हा फोन ग्राहकांना मोफत मिळणार आहे. मात्र अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये मोजावे लागतील, जे तीन वर्षांनी ग्राहकांना परत मिळतील.