महाराष्ट्राचा हा मुलगा डान्समध्ये प्रभू देवाला फाईट देतोय...

By Jaywant Patil | Last Updated: Saturday, June 17, 2017 - 20:03

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : अभिनेता प्रभू देवाचा डान्स हा काही और आहे, एका कलाकाराची दुसऱ्या कलाकाराशी तुलना करता येणार नाही, मात्र प्रभू देवाचं नाव न घेता असे कलाकार जगासमोरही येणार नाहीत. 

हे प्रभू देवा....

यूट्यूबमुळे देखील असे कलाकार सर्वांसमोर येत आहेत, यातील संदीप भोई हा प्रभू देवाच्या तोडीस तोड डान्स करतो, हे त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून लक्षात येत आहे.

सर्व व्हिडीओ पाहिल्यानंतरचा संदीप

संदीप भोईचं Jungli Xandip हे YOU TUBE चॅनेल आम्ही फार व्यवस्थित पाहिलं, यातील व्हिडीओंचा दर्जा एवढा चांगला नसला, तरी संदीपचा डान्स आणि अॅक्टिंगने यात रंग भरले आहेत. संदीपची परिस्थिती तशी फार बेताची दिसतेय, कारण संदीप इतर कलाकारांसारखा सारखे कपडे बदलताना दिसत नाही. संदीपचे हे व्हिडीओ त्याच्या शहरातील शाळा-कॉलेजच्या कार्यक्रमातील मोबाईलवर शूट केलेले आहेत.

कथ्थकपासून स्थानिक भाषेतील गाण्यांवर डान्स

हा असा आधुनिक डान्सर आहे की, तो कथ्थक पासून स्थानिक भाषेतील गाण्यांवरही डान्स करू शकतो, संदीपची अॅक्टिंगही तशी तोडीस तोड आहे. तो क्राईम पेट्रोलंच विडंबन करत त्याने क्राईम डिझेल सादर केलं आहे, ते अप्रतिम आहे, त्याचे लहान-लहान व्हिडीओ तुम्हाला हसायला लावतात, जगाच्या बदलत्या ट्रेन्डसोबत तुम्हाला नेऊन ठेवतात. 

हा सर्वसामान्य कलाकार कोट्यवधीच्या घरात जाऊ शकतो...

संदीप हा मोठा यूट्यूबर आणि कलाकार म्हणून नावारूपास आला, तर तो कोट्यवधींचा टप्पा नक्कीच पार करेल. संदीपच्या Jungli Xandip या YOU TUBE चॅनेलला आताच अडीच हजार सब्सस्क्राईबर्स आहेत.

फरसाणचा व्यवसाय बॅकग्राऊंडला दिसतो...

संदीपच्या वडिलांचा छोटासा फरसाणचा व्यवसाय आहे, तो घरातच मोठ्या प्रमाणात व्हिडीओ शूट करताना हे सर्व साहित्य दिसतो, यावरून हा अंदाज येतो, एकदा त्याने भलामोठा झारा हातात घेऊन डान्स केला आहे.

First Published: Saturday, June 17, 2017 - 18:19
comments powered by Disqus