मारूती सुझुकी स्विफ्टचं लिमिटेड एडिशन भारतात लॉन्च

मारूती सुझुकी स्विफ्टचं सध्याचं जनरेशन मॉडल भारतात सर्वात जास्त लोकप्रिय आहे.

Updated: Nov 22, 2017, 12:21 PM IST
मारूती सुझुकी स्विफ्टचं लिमिटेड एडिशन भारतात लॉन्च title=

नवी दिल्ली : मारूती सुझुकी स्विफ्टचं सध्याचं जनरेशन मॉडल भारतात सर्वात जास्त लोकप्रिय आहे. आता या मॉडलचं अपडेटेड व्हर्जन तयार झाला असून ते २०१८ ऑटो एक्स्पोमध्ये सादर केलं जाणार आहे. अशातच देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीने स्विफ्ट हॅचबॅकचा स्पेशल एडिशन अवतार लॉन्च केला आहे. 

किती आहे किंमत?  

या कारच्या पेट्रोल व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत ५.४५ लाख रूपये आणि डिझल मॉडलची किंमत ६.३४ लाख रूपये ठेवण्यात आली आहे. या कारच्या सध्याच्या मॉडलमध्ये काही फिचर्स आणि कॉस्मेटीक बदल करण्यात आले आहेत. 

काय आहेत फिचर्स?

या कारमध्ये तुम्हाला बोनट, दरवाजे आणि टॉपला डेकल्स बघायला मिळतील. तर कॅबिनला सीट आणि स्टीयरिल व्हिलसोबत मॅच करत तयार करण्यात आलं आहे. मारूतीने यात बलेनो, इग्निस आणि एस-क्रॉससारखीच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम दिली आहे. ही सिस्टम अ‍ॅपल कारप्ले आणि अ‍ॅन्ड्रॉईड ऑटोला सपोर्ट करते. तसेच ब्लूटूथ कनेक्टीव्हिटीलाही सपोर्ट करते.