Redmi 5 आणि Redmi 5 Plus चे धासू फीचर, जाणून घ्या स्पेशिफिकेशन

चीनची मोबाइल कंपनी एमआयने दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 8, 2017, 05:42 PM IST
Redmi 5 आणि Redmi 5 Plus चे धासू फीचर, जाणून घ्या स्पेशिफिकेशन  title=

मुंबई : चीनची मोबाइल कंपनी एमआयने दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. 

शाओमी रेडमी ५ आणि रेडमी ५ प्लस हे दोन फोन लाँच झाले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनला कंपनीने बीजिंगच्या एका कार्यक्रमात सादर केले आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अगदी बारिक अशा डिस्प्ले सोबत बाजारात उपलब्ध झाले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर ते एकसारखेच आहे. मात्र स्पेशिफिकेशनच्या बाबतीत मात्र मोठी तफावत आहे. कंपनीचा असा दावा आहे की, हे दोन्ही फोन 

गेम आणि व्हिडिओसाठी उत्कृष्ठ असल्याचं सांगण्यात येत आहे. चीनमध्ये उपलब्ध असणारे हे दोन्ही फोन लवकरच भारतीय बाजारात देखील उपलब्ध होणार आहेत. 

स्मार्टफोनचे स्टोरेज :

एमआय Redmi 5 ला २ जीबी रॅम, १६ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेजसोबत आणण्यात आली आहे. तसेच Redmi 5A हा ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेजसोबत आला आहे. या दोन्ही फोनची विक्री ही १२ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. यासाठी लवकरच रजिस्ट्रेशन सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही फोनसोबत एक उत्कृष्ठ कव्हर मिळणार आहे जे तुम्हाला लूक बदलण्यासाठी मदत करणार आहे. 

डिस्प्ले :

ड्यूअल सिम असलेले Redmi 5 आणि Redmi 5 Plus याचे अधिक स्पेशिफिकेशन बहुतांश एकसारखे आहे. रेडमी ५ मध्ये ५.७ इंचाचे ७२०*१४४० पिक्सल रिझोल्युशन असलेले एचडी प्लस डिस्प्ले आहे. तिथेच Redmi 5 Plus चे ५.९९ इंच असून १०८०*२१६० पिक्सल रिझोल्यूशन फूल एचडी प्लस डिप्ले असणार आहे. 

प्रोसेसर :

कंपनीनेने Redmi 5 मध्ये स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर दिले असून Redmi 5 Plus मध्ये स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर आहे. कंपनीचा दावा आहे की दोन्ही प्रोसेसर आपल्या रेंजमध्ये अतिशय उत्तम आहेत. 

रॅम :

Redmi 5 चे २ जीबी च्या वेरिएंटमध्ये १६ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच ३ जीबी रॅमच्या वेरिएंटमध्ये ३२ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. तर Remdi 5 Plus मध्ये ३ जीबी वेरिएंटमध्ये ३२ जीबीचे इंटरनल स्टोरेज आहे. तर ४ जीबीच्या वेरिएंटमध्ये ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. 

कॅमेरा : 

दोन्ही स्मार्टफोनचा सेटअप एकसारखाच आहे. Redmi 5 आणि Redmi 5 Plus १२ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून तो १.२५ मायक्रोन पिक्सल सेसंर आणि फ्लॅशसोबत आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी फोनमध्ये ब्यूटीफाय ३.० एप देत आहे. 

बॅटरी :

Redmi 5 मध्ये ३३०० एमएएच बॅटरी असून  Redmi 5 Plus मध्ये ४००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की दोन्ही बॅटरीमध्ये बॅटरी बॅकअप उत्तम देण्यात आले आहे.