४९ रुपयांत मिळणार मोठा फायदा, या ठिकाणाहून खरेदी करु शकता JIO PHONE

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नव-नवे प्लान्स उपलब्ध करुन दिले आहेत. त्यानंतर आता ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. पाहूयात काय आहे ही खास ऑफर...

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 11, 2018, 03:15 PM IST
४९ रुपयांत मिळणार मोठा फायदा, या ठिकाणाहून खरेदी करु शकता JIO PHONE

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नव-नवे प्लान्स उपलब्ध करुन दिले आहेत. त्यानंतर आता ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. पाहूयात काय आहे ही खास ऑफर...

युजर्स आता मोबिक्विक अॅपवरुनही जिओ फोन खरेदी करु शकणार आहेत. रिलायन्स जिओने डिजिटल पेमेंट अॅप मोबिक्विकसोबत एक करार केला आहे. याच्या माध्यमातून मोबिक्विक आपल्या अॅपवर जिओचा फिचर फोन विकणार आहे.

मोबिक्विक पहिली मोबाईल वॉलेट कंपनी आहे जेथे 'जिओ फोन' विक्रिसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

४९ रुपयांत मिळणार अनलिमिटेड डेटा 

जिओ फोनसोबत युजर्सला धमाकेदार ऑफर्सही मिळत आहेत. रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच आपल्या फिचर फोन युजर्ससाठी एक धमाकेदार ऑफर लॉन्च केली होती. या ऑफरनुसार, युजर्सला केवळ ४९ रुपयांत अनलिमिटेड डेटा आणि फ्री वॉईस कॉलिंगची ऑफर मिळत आहे. 

बुकिंग नंतर स्टोअरमध्ये मिळणार फोन

मोबिक्विकचे बिजनेस हेड विक्रम वीर सिंह यांच्या मते, जिओ फोन खरेदी करणारे युजर्स अॅपवर चार सिंपल स्टेप्स फॉलो करुन फोन खरेदी करु शकतील. बुकिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना जिओतर्फे एसएमएस मिळेल. या SMSमध्ये जिओ स्टोअर्सची माहिती दिली असेल त्या स्टोअर्समध्ये ग्राहक आपला बुक केलेला फोन खरेदी करु शकतात. 

काय आहे कंपनीचा प्लान?

अद्यापही भारतात अनेक युजर्स आहेत जे फिचर फोनचा वापर करतात. अशा नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी रिलायन्स जिओने आपला ४जी फिचर फोन बाजारात उपलब्ध केला. डिसेंबर महिन्यात या फोनची रेकॉर्ड विक्री झाली होती. मात्र, अद्यापही अनेक ग्राहकांना हा फोन मिळत नाहीये. पण आता मोबिक्विक अॅपवरुन हा फोन सहज मिळवता येणार आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close