Moto G6, मोटो G6 Plus आणि Moto G6 Play लॉन्च; पाहा फीचर्स, किंमत

 मोटो जी 6 सिरिजचे ३ स्मार्टफोन्स आज लॉन्च झाला आहे. पाहा फोनची किंमत आणि फीचर्स

Updated: Apr 19, 2018, 09:31 PM IST
Moto G6, मोटो G6 Plus आणि Moto G6 Play लॉन्च; पाहा फीचर्स, किंमत title=

साओ पाऊलो  : मोटो जी 6 सिरिजचे ३ स्मार्टफोन्स आज लॉन्च झाला आहे. अनेक दिवसांपासून या सिरिजच्या फोनची माहिती लीक होत होती. ही सिरीज आज अखेर ब्राझिलच्या साओ पाऊलो शहरातील एका इव्हेंटमध्ये लॉन्च झाली. या सिरीजमध्ये मोटो जी 6, मोटो 6 प्लस, आणि मोटो जी 6 प्ले, या ३ स्मार्टफोन्सचा समावेश आहे. यात मोटो जी6, मोटो 6 प्लस फोनमध्ये डुअल कॅमेरा, तर मोटो जी 6 प्ले'मध्ये सिंगल सेन्सर असेल. काही महिन्यापासून या फोनचे लीक्स सोशल मीडियावर येत होते, त्यामुळे या फोन्सचे स्पेसिफिकेशंस पहिल्यांदाच समोर आले होते.

मोटो जी 6 फोनचे स्पेसिफेकेशन्स

मोटो जी 6 या फोनची अंदाजे किंमत १६ हजार रूपये असू शकते. 
फोनमघ्ये 5.7 मॅक्स व्हिजन.
18:9 एक्सपेक्ट रेशियोची फुल रेझ्युलेशन डिस्प्ले असेल.
मात्र आता पर्यंत लीक झालेल्या फोन्सवरून यात डिस्प्ले बेजललेस नसेल.
फोन अँड्रॉईड 8.0 ओरियोवरही काम करेल.
मोटो जी 6 मध्ये 4 जीबी रॅम सोबत 1.8GHz octa-core Snapdragon 450 प्रोसेसर असेल.

कॅमेरा कसा असेल?

यात रियर डुअल कॅमेरा आहे. ज्यात प्रायमरी सेन्सर ८ मेगापिक्सचा सेकंडरी कॅमेरा आहे, आणि सेन्सर ५ मेगापिक्सलचा असेल.
सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
फोनमध्ये इंटरनल स्टोरेज 64 जीबी असेल, आणि 128 जीबी पर्यंत वाढवता येईल.
कनेक्टीव्हीटीसाठी फोनमध्ये  4G VoLTE, WiFi 802.11 b/g/n, Bluetooth 4.2 चे ऑप्शन असतील.
फोनमध्ये टर्बो चार्जिंगचा सपोर्ट असेल, फिंगरप्रिन्ट सेन्सर डिस्प्ले बेजलच्या खाली मिळेल.

मोटो जी6 प्लस के स्पेसिफिकेशन्स 

मोटो जी6 प्लसच्या किंमतीबद्दल अजून काही सांगता येणार नाही. फोनवर 5.93 इंचाची 18:9 एक्सपेक्ट रेशियोवाला फुल रेझ्युलेशनचा डिस्प्ले असेल. फोन अँड्राईडच्या ओरिओ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. तर मोटो जी ६ प्लसमध्ये Qualcomm Snapdragon 630 प्रोसेसर असेल. फोनमध्ये 6GB रॅम असेल, मोटो जी6 प्लसमध्ये 3200mAh ची बॅटरी सोबत फिंगर प्रिन्टचा सेन्सर देखील मिळेल.   

मोटो जी 6 प्ले स्पेसिफिशेन्स

मोटो जी ६ ची अंदाजे किंमत १३ हजार रूपये असू शकते. फोनमघ्ये 5.7 इंच मॅक्स व्हिजन, 18.9 एक्सपेक्ट रेशिओची फूल रेझ्युलेशन डिस्प्ले असेल. पण या सिरिजमध्ये इतर फोन्स प्रमाणे, फिंगर प्रिन्टस डिस्प्लेच्या खाली नसेल, तर फोनच्या मागील भागावर असेल, आणि तो फोन अँड्राईड 8.0 ओरिओवर काम करेल. मोटो जी ६ मध्ये 1.4GHz octa-core 64-bit Snapdragon 430 (MSM8937) प्रोसेसर असेल, आणि त्या सोबत २ जीबी रॅम असेल.