मोटो जी6 प्लस भारतात लॉंच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

 'अमेझॉन' वर 1500 रुपयांच्या डिस्काऊंटमध्ये हा फोन मिळतोय.

Updated: Sep 10, 2018, 02:59 PM IST
मोटो जी6 प्लस भारतात लॉंच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स  title=

नवी दिल्ली : मोटो जी 6 भारतात लॉंच झालाय. मोटो जी 6 आणि मोटो जी 6 प्ले दोन स्मार्टफोनपेक्षाही मोटो जी6 मध्ये चांगले फिचर्स आहेत. मोटो जी6 हा ड्युअल सिमचा स्मार्टफोन आहे. यामध्ये 5.93 इंचचा फुल डिस्प्ले देण्यात आलाय. हा फोन 8.0 ओरियो अॅण्ड्रॉइड ऑपरेटींग सिस्टिमवर काम करेल.  फोनमध्ये 630 Soc का ओक्टाकोर स्नैपड्रेगन प्रोसेसर असून 6 जीबी रॅम तसेच ड्युअल रिअर कॅमेराही आहे.

फिचर्स 

यामध्ये 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. याचा सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे. याला इनबिल्ट मेमरी 64 जीबी रॅम असून 128 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय 4G LTE, वायफाय, ब्लूटूथ 5.0, यूसीएबी टाइप सी, एनएफसी, आणि 3.5 एमएमचा जॅक आहे. फोनमध्ये 3,200 एमएएचची बॅटरी असून याचं वजन 165 ग्रॅम आहे. यामध्ये फिंगरप्रिंट सेसंर असून फोन डॉल्बी ऑडियो सपोर्टदेखील दिला आहे.

1500 डिस्काऊंट 

हा फोन लवकरच अॅन्ड्रॉइड 9.0 अपडेटमध्ये उपलब्ध होणार आहे. 6 जीबी रॅम वाल्या मॉडेलची किंमत 22,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन अमेझॉनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. फोनची मूळ किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 'अमेझॉन' वर 1500 रुपयांच्या डिस्काऊंटमध्ये हा फोन मिळतोय.