सेल्फी घेताना होणाऱ्या अपघातांपासून वाचवणार हे अॅप

कोणतं अॅप 

सेल्फी घेताना होणाऱ्या अपघातांपासून वाचवणार हे अॅप  title=

मुंबई : सेल्फी घेताना अपघात होण्याची शक्यता अधिक असते. सेल्फीमुळे अनेकांनी आपला जीव गमावल्याचं आपण ऐकलं आहे. मात्र आता अशा घटना थांबवता येणार आहेत. आता एक असं अॅप आलंय ज्यामुळे सेल्फी घेताना होणाऱ्या दुर्घटनांची पूर्वसूचना देणार आहेत. 

दिल्लीच्या इंद्रप्रस्थ इंस्टीट्यूट ऑफ इंफोर्मेशन टेक्नॉलॉजीमधील संशोधकांनी 'सेफ्टी' नावाचं अॅप तयार केलं. या टीमचे प्रमुख प्रो पी कुमारगुरूने सांगितलं की, हे अॅप सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करणार आहे. कॅमेरा जो फोटो काढतोय त्याचा रिअल टाइम अॅनालिसिसस करतं. जर कोणता फोटो खतरनाक असेल तर तो सेल्फी घेणाऱ्याला अलर्ट करणार आहे. हे अॅप डीप लर्निंग टेक्नॉलॉजीपासून तयार केलं आहे. 

महत्वाचं म्हणजे  हे अॅप मोबाइल डाटा बंद असल्यावर देखील वापरता येणार आहे. सेल्फी घेतना जर तुम्ही रेल्वेच्या ट्रॅकवर असाल किंवा कोणच्या जलाशयाजवळ असाल तर तुम्हाला ते नोटीफिकेशन देणार आहे की ही जागा असुरक्षित आहे.