पाहा कशी आहे नवी, मारूती सुझुकीची 'स्विफ्ट'

स्विफ्ट 2018 असं या नव्या आवृत्तीचं नाव आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 9, 2018, 04:38 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो 2018 मध्ये गुरुवारी देशातल्या सर्वात लोकप्रिय मारूती सुझुकी स्विफ्ट गाडीची नवी आवृत्ती खुली करण्यात आली. स्विफ्ट 2018 असं या नव्या आवृत्तीचं नाव आहे. 

स्विफ्टमध्ये करण्यात आला आहे, अमुलाग्र बदल

सध्याच्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या स्विफ्ट आणि नव्या स्विफ्टमध्ये अनेक अमुलाग्र बदल करण्यात आलेत. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे मागे बसणाऱ्यांचा प्रवास आरामदायी व्हावा पायांसाठीची जागा वाढवण्यात आलीय. 

लॉन्चिंग आधीच 40 हजार स्विफ्ट बूक

शिवाय गाड्यांच्या बाजारात सर्वात स्पर्धात्मक अशा या सेगमेंटमध्ये स्विफ्ट 2018 किंमतही स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे लॉन्चिंग आधीच 40 हजार स्विफ्ट 2018 आधीच बुक झाल्या आहेत.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close