नोकिया १०५ आणि १३० फीचर फोन लाँच

नोकिया ३३१० हा फोन लाँच केल्यानंतर आता नोकिया १०५ आणि नोकिया १३० हे नवे फोन भारतात लाँच करण्यात आलेत. 

Updated: Jul 17, 2017, 06:35 PM IST
नोकिया १०५ आणि १३० फीचर फोन लाँच

नवी दिल्ली : नोकिया ३३१० हा फोन लाँच केल्यानंतर आता नोकिया १०५ आणि नोकिया १३० हे नवे फोन भारतात लाँच करण्यात आलेत. 

सिंगल सिमच्या फोनची किंमत कंपनीने ९९९ रुपये इतकी ठेवलीये. तर ड्युअल सिमच्या फोनची किंमत ११४९ रुपये इतकी आहे. १९ जुलैपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 

नोकिया १०५चे फीचर्स

१.८ इंचाचा कलर डिस्प्ले
८००एमएएच बॅटरी
एफएम रेडिओ
४ एमबी रॅम
४ एमबी मेमरी

नोकिया १३०चे फीचर्स

१.८ इंचाचा QVGA कलर डिस्प्ले
४ एमबी रॅम
४ एमबी मेमरी
३२ एमबी पर्यंत वाढवण्याची सुविधा
१०१० एमएएच बॅटरी
एफएम रेडिओ आणि ११.५ तासांचा व्हिडीओ प्लेबॅक