नोकिया-६ स्मार्टफोन जुलैमध्ये विक्रीला उपलब्ध, जबरदस्त फीचर्स

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६बद्ल माहिती दिलेय. हा स्मार्टफोन जुलै महिन्यात विक्रीला उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन खरेदीसाठी १४ जुलैला उपलब्ध होईल. त्यासाठी तुम्हाला रजिस्टेशन करावे लागेल. हा फोन अमेरिकेत २२९ डॉलरला (अर्थात १४,८०० रुपये) उपलब्ध होईल.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 28, 2017, 04:56 PM IST
नोकिया-६ स्मार्टफोन जुलैमध्ये विक्रीला उपलब्ध, जबरदस्त फीचर्स title=
संग्रहित छाया

मुंबई : एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६बद्ल माहिती दिलेय. हा स्मार्टफोन जुलै महिन्यात विक्रीला उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन खरेदीसाठी १४ जुलैला उपलब्ध होईल. त्यासाठी तुम्हाला रजिस्टेशन करावे लागेल. हा फोन अमेरिकेत २२९ डॉलरला (अर्थात १४,८०० रुपये) उपलब्ध होईल.

नोकिया-६ मॅट ब्लॅक आणि सिल्वर रंगात उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन ५.५ इंच असून फूल एचडी डिसप्ले  आहे. २.५ डी गोरिला ग्लास असून यात क्लालकॉम स्नेपड्रगर ४३० ओक्टाकोर चिपसेट आहे. हा फोन ३ जीबी रॅम असून ३२ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच २५६ जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्डने मेमरी वाढवता येऊ शकते.

या फोनमध्ये सेल्फीसाठी फ्रंट ८ मेगापिक्सेल आणि रिअर कॅमेरा १६ मेगापिक्सेल आहे. या फोनची बॅटरी क्षमता ३,००० एमएएच आहे. या स्मार्टफोन एंड्राइड नॉगटवर आधारित आहे. नोकिया ६मध्ये कनेक्टिव्हीटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर, वाय-फाय, ब्लूटूथ आणि युएसबी टाईप सी-पोर्ट देण्यात आलाय.

भारतात नोकिया -३ , नोकिया -५ आणि नोकिया -६ लॉन्च केलाय. नोकिया -३ आणि नोकिया -५ आणि नोकिया -६ अनुक्रमे ९,४९९ रुपये, १२,८९९ रुपये आणि १४,९९९ रुपये अशी किंमत असणार आहे.