वन प्लस५ टी भारतात, २० जानेवारी सेल

चीनची स्मार्टफोन निर्माता वनप्लसने वनप्लस ५ टीचे 'लावा रेड' एडिशन गुरूवारी भारतात लॉंच केला. 

Updated: Jan 13, 2018, 03:40 PM IST
वन प्लस५ टी भारतात, २० जानेवारी सेल

नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन निर्माता वनप्लसने वनप्लस ५ टीचे 'लावा रेड' एडिशन गुरूवारी भारतात लॉंच केला.

वनप्लस ५ टीप्रमाणेच ६ जीबी रॅम,६४ जीबी इंटरनल स्टोरेज आणि १२८ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज व्हेरिएंट आणले आहे. 

पॉवरफुल फिचर्स

वनप्लस ५ टी आमचा पहिला स्मार्टफोन असून सुंदर डिझाइन आणि पॉवरफुल फिचर्समूळे तो सर्वांच्या पसंतीस पडेल असा विश्वास महाप्रबंधक विकास अग्रवाल यांनी व्यक्त केला. 

ड्युअल कॅमेरा

१६ मेगापिक्सल फ्रंट आणि २० मेगापिक्सल बॅक कॅमेरा, एफ/१.७ अॅपेरचर

 क्वालकॉम स्नैपड्रैगन 

 ६ इंच स्क्रीन

फुल-ऑप्टिक एमोलेड डिस्प्ले  (अस्पॅक्टट रेशियो १८ :९) 

डॅश चार्जिंग 

किंमत 

लॉंचवेळी याची किंमत ३७,९९९ रुपये इतकी आहे. अमेझॉनवर २० जानेवारीला असणाऱ्या सेलमध्ये हा फोन उपलब्ध होईल.