भारतात केवळ 'इतके' टक्के महिला करतात इंटरनेटचा वापर!

भारतात इंटरनेट वापरण्यात महिलांपेक्षा पुरूष आघाडीवर आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 12, 2017, 09:52 AM IST
भारतात केवळ 'इतके' टक्के महिला करतात इंटरनेटचा वापर! title=

नवी दिल्ली : भारतात इंटरनेट वापरण्यात महिलांपेक्षा पुरूष आघाडीवर आहेत. संयुक्त राष्ट्राच्या अध्ययनानुसार, भारतात केवळ 29% महिला इंटरनेटचा वापर करतात. 

महिलांवर अनेक प्रकारची बंधने 

‘स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन 2017 : चिल्ड्रेन इन ए डिजिटल वर्ल्ड’च्या रिपोर्टनुसार, ग्रामीण भागात महिलांवर अनेक प्रकारची बंधने असतात. आणि याचे मुख्य कारण म्हणजे लिंगभेद.

अहवालानुसार...

अहवालानुसार, जगभरात 2017 मध्ये महिलांच्या तुलनेत पुरूषांची संख्या 12% अधिक आहे. भारतात पुरूषांच्या तुलनेत महिलांची संख्या एक तृतीयांश कमी आहे. मात्र डिजिटल जगापासून मुलींना दूर ठेवण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे अहवालात म्हटले आहे.

भारत शेवटच्या क्रमांकावर

काही दिवसांपुर्वी इंटरनेट स्पीडचे विश्लेषण करणाऱ्या संस्थेने ओपन सिग्नलचे नवे रिपोर्ट सादर केले होते. त्यात 4G LTE स्पीडमध्ये भारत 77 देशांच्या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे. यावर्षी जूनमध्ये भारत 75 देशांमध्ये 74 व्या स्थानावर होता. तर शेवटच्या स्थानावर कोस्टा रिका हा देश होता. मात्र तो देखील आता भारतापुढे गेला आहे. 

इतका आहे स्पीड

 

भारतात 4G स्पीड 6.13 Mbps आहे. तर जगभरात 3G स्पीड 4.4 Mbps आहे. म्हणजेच आपल्याला 4G मध्ये 3G चा स्पीड मिळत आहे. जगभरात 4G कनेक्शनवर डाऊनलोड स्पीड 16.2 Mbps आहे. सिंगापूरमध्ये हा स्पीड सर्वात अधिक म्हणजे 46.6 Mbp आहे. दुसऱ्या स्थानावर साऊथ कोरिया आहे. तिथे  45.9 Mbps स्पीडमध्ये डेटा डाऊनलोड करू शकतो.