स्मार्टफोन, अ‍ॅपच्या मदतीने नव्हे तर 'बूटां'च्या माध्यमातून करा पिझ्झाची ऑर्डर

पिझ्झा हटकडून पिझ्झा मागवायचा असेल तर तुम्हांला फोन नंबर,वेबसाईटवर लॉगिन किंवा अगदी अ‍ॅपच्या माध्यमातून मागवता येईल असे वेगवेगळे पर्याय तुम्हांला ठाऊक असतील. पण तुमच्या बूटद्वारा पिझ्झा ऑर्डर करता येऊ शकतो हे ठाऊक आहे का ?  

Updated: Mar 7, 2018, 07:36 PM IST
स्मार्टफोन, अ‍ॅपच्या मदतीने नव्हे तर 'बूटां'च्या माध्यमातून करा पिझ्झाची ऑर्डर

 मुंबई : पिझ्झा हटकडून पिझ्झा मागवायचा असेल तर तुम्हांला फोन नंबर,वेबसाईटवर लॉगिन किंवा अगदी अ‍ॅपच्या माध्यमातून मागवता येईल असे वेगवेगळे पर्याय तुम्हांला ठाऊक असतील. पण तुमच्या बूटद्वारा पिझ्झा ऑर्डर करता येऊ शकतो हे ठाऊक आहे का ?  

 Pie Tops स्नीकर्ससोबत भागीदारी  

 वर्षभरापूर्वी  पिझ्झा हटने Pie Tops स्नीकर्स लॉन्च केले. आता या बूटाचे नवं व्हर्जन Pie Top-2 लॉन्च करण्यात आले आहे.  

 ब्लू टुथ द्वारा ऑर्डर करा पिझ्झा 

 पिझ्झा हटच्या या बूटामध्ये ब्लूटुथ लावण्यात आले आहे. यासोबत तुमचा फोन कनेक्टेड असेल. तुमच्या मोबाईलमध्ये पाय टॉप्स अ‍ॅप डाऊनलोड करायचे आहे. बूटातील केवळ एका बटणाच्या मदतीने आता पिझ्झा ऑर्डर करणं शक्य होणार आहे.  

 मॅच पाहताना पिझ्झा खाणं प्रेक्षकांना आवडतं   

 मॅच पाहताना अनेक प्रेक्षकांना पिझ्झा खाणं आवडतं. प्रेक्षकांची ही आवड लक्षात घेता पिझ्झा हटने ही नवी सोय खुली केली आहे. या बुटांच्या मदतीने केवळ पिझ्झा हटचे पिझ्झा ऑर्डर करता येतात.  

 मोजक्या प्रमाणात बूट उपलब्ध   

 पिझ्झा हटचे पिझ्झा बूटांच्या मदतीने ऑर्डर करण्यासाठी केवळ 50 बूटांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र भारतात अजूनही हे बूट लॉन्च करण्यात आलेले नाहीत.