पूनम महाजन आणि मुख्यमंत्री योगी यांच्या फोटो मागचं 'व्हायरल सत्य'

भाजपाचे दिवंगत नेते यांची कन्या, खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांचा फोटो...

Updated: Oct 10, 2018, 08:26 PM IST
पूनम महाजन आणि मुख्यमंत्री योगी यांच्या फोटो मागचं 'व्हायरल सत्य' title=

मुंबई : भाजपाचे दिवंगत नेते यांची कन्या, खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांचा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो खेलो भारत अभियान लॉन्चिंग दरम्यानचा आहे. ७ जुलै २०१७ रोजी झाला होता, भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा असल्याच्या नात्याने पूनम महाजन या कार्यक्रमास हजर होत्या. पण हा फोटो यूपीत कल्पना तिवारी या महिलेच्या नावाने व्हायरल होत होता.

काय म्हटलं गेलं फोटोखाली?

फोटोखाली म्हटलंय, मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत हसत असलेली ही महिला कल्पना तिवारी आहे. कल्पना तिवारी यांच्या पतीच्या मृत्युनंतरही ती किती आनंदी आहे, असे टोमणे लोक मारत आहेत. 

कल्पना तिवारी यांचं चरित्र हनन करण्यासाठी पूनम महाजन यांच्या फोटोचा वापरला गेला आहे. पण सोशल मीडियावर काहीही लपून राहत नाही.

कोण आहेत विवेक तिवारी आणि कल्पना तिवारी?

vivek_tiwariविवेक तिवारी हे बहुराष्ट्रीय कंपनी अॅपलचे कर्मचारी होते, त्यांचा मृत्यू २९ सप्टेंबर रोजी यूपी पोलिसाच्या गोळीने झाला. कॉन्स्टेबल प्रशांत चौधरीने चुकून गोळी झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

यानंतर यूपी सरकारने विवेक तिवारी यांच्या पत्नी कल्पना तिवारी यांना सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते अजून पूर्ण होवू शकलेलं नाही.

यूपी सरकारकडून कल्पना तिवारी यांना घर आणि सरकारी नोकरीचं आश्वसान देण्यात आलं आहे, हे प्रकरण मुख्यमंत्री योगी यांच्यापर्यंत पोहोचलं होतं. पण अद्याप त्यांना मदत मिळालेली नाही.