RABF | मुंबई आणि पुण्यात 'बॉयफ्रेन्ड रेन्ट'वर मिळणार

तुम्हाला नैराश्याने ग्रासलं असेल, तर तुम्हाला बॉयफ्रेन्ड रेन्टवर मिळणार आहे.

Updated: Aug 28, 2018, 11:08 PM IST
RABF | मुंबई आणि पुण्यात 'बॉयफ्रेन्ड रेन्ट'वर मिळणार

मुंबई : तुम्हाला नैराश्याने ग्रासलं असेल, तर तुम्हाला बॉयफ्रेन्ड रेन्टवर मिळणार आहे. नैराश्यापासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला ब्रॉयफ्रेन्ड रेन्टने मिळू शकतो, त्यासाठी एक वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सध्या मुंबई आणि पुण्यात मिळणार असल्याचं, या वेबसाईटवर दिसून येत आहे.

कौशल प्रकाश, या २९ वर्षाच्या तरूणाने 'रेन्ट अ बॉयफ्रेन्ड' ही वेबसाईट सुरू केली आहे. गूगलवर आरबीएफ म्हणजेच 'रेन्ट अ बॉयफ्रेन्ड' टाकल्यावर तुम्हाला ही वेबसाईट दिसेल. ही वेबसाईट सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे. यात बॉयफ्रेन्डला तुम्हाला खासगी ठिकाणी भेटता येणार नाही, असा नियम आहे.

म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला भेटावं लागेल. यात रेस्टॉरंट, कॅफे, सिनेमागृह यासारख्या जागांचा समावेश असेल. 

तुम्हाला मॉडेल, सेलिब्रिटी आणि आम आदमी बॉयफ्रेन्ड म्हणून निवडता येतील. मॉडेलसाठी प्रतितास २ हजार रूपये, सेलिब्रिटीसाठी प्रतितास ३ हजार रूपये, तर आम आदमी म्हणजेच सामान्य माणसासाठी प्रतितास ४०० ते ५०० रूपये आकारले जातील.

बॉयफ्रेन्ड म्हणजे तुमच्या भावना समजून घेणारा मित्र, असं सांगून तुमची माहिती गोपनीय ठेवली जाणार असल्याचा दावा या वेबसाईटकडून केला जात आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close