शाओमीचा Redmi 5A लॉन्च, ८ दिवस चालणार बॅटरी

शाओमीने रेडमी 4A (Xiaomi Redmi 4A) या यशानंतर आता रेडमी सीरिजचा नवा फोन बाजारात लॉन्च केलाय. नव्या Redmi 5A मध्ये मेटल टेक्स्चर आहे.

Updated: Oct 17, 2017, 01:47 PM IST
शाओमीचा Redmi 5A लॉन्च, ८ दिवस चालणार बॅटरी title=

नवी दिल्ली : शाओमीने रेडमी 4A (Xiaomi Redmi 4A) या यशानंतर आता रेडमी सीरिजचा नवा फोन बाजारात लॉन्च केलाय. नव्या Redmi 5A मध्ये मेटल टेक्स्चर आहे.

कंपनीने दावा केलाय की, हा फोन मेटलपेक्षा बराच हलका आहे. याच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं तर कंपनीने दावा केलाय की, फोनचं वजन १३७ ग्रॅम इतकं आहे. या फोनची दुसरी खासियत म्हणजे कंपनीने दावा केलाय की, एकदा फोन चार्ज केला तर ८ दिवस बॅटरी पुरेल. तसंच फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलंय. 

Redmi 5A ची किंमत -

कंपनीने या शाओमी रेडमी 5A ची किंमत चीनमध्ये ५९९ चीनी युआन भारतीय रूपयांमध्ये ६ हजार रूपये इतकी ठेवली आहे. हा फोन चीनमध्ये एमआयच्या वेबसाईटवर, ऑनलाईन स्टोरवर, जेडी डॉट कॉम आणि इतरही वेबसाईटवर मिळेल. 

कलर व्हेरिएंट -

MIUI 9 वर चालणारा रेडमी 5A स्मार्टफोन प्लेटिनम सिल्वर, चेरी पावडर आणि शॅंपेन गोल्ड कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. 

डिस्प्ले -

शाओमी Redmi 5A मध्ये ५ इंचाचा 720x1280 पिक्सल आयपीएस डिस्प्ले देण्यात आलाय. 296 ppi डेनसिटी स्क्रीन असलेल्या या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर दिलं गेलंय. जे १.४ गीगीहर्ट्जवर चालतं. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये एड्रेनो ३०८ जीपीयू दिलंय. 

रॅम आणि मेमरी -

Redmi 5A मध्ये २जीबी रॅम देण्यात आली आहे. तर १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आलीये. जे मायक्रो एसडी कार्डने १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन हायब्रिड ड्युअल सिम स्लॉट सपोर्ट करतो. 

कॅमेरा आणि बॅटरी -

Redmi 5A मध्ये f/2.2 अपर्चरसोबत १३ मेगापिक्सल रिअर आणि f/2.0 अपर्चर लेन्ससोबत ५ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा आहे. अन्ड्रॉईड ७.१ वर चालणा-या या फोनमध्ये 3000 mAh बॅटरी देण्यात आलीये. हा कॅमेरा १०८० पिक्सल आणि ७२० पिक्सलवर व्हिडिओ रेकॉर्डींगला सपोर्ट करतो.