या कंपनीने दिली ३३ रुपयांत १जीबी डेटा आणि कॉलिंगची सुविधा

दररोज टेलिकॉम कंपन्या नवे प्लॅन्स लॉन्च करत असल्याचं पहायला मिळत आहे. आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने ३३ रुपयांच्या नव्या प्लॅनची घोषणा केली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 23, 2017, 11:34 PM IST
या कंपनीने दिली ३३ रुपयांत १जीबी डेटा आणि कॉलिंगची सुविधा title=
File Photo

नवी दिल्ली : दररोज टेलिकॉम कंपन्या नवे प्लॅन्स लॉन्च करत असल्याचं पहायला मिळत आहे. आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने ३३ रुपयांच्या नव्या प्लॅनची घोषणा केली आहे.

रिलायन्स कम्युनिकेशनच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट डेटा आणि व्हॉईस कॉलिंग या दोघांचाही फायदा होणार आहे. या प्लॅनसंदर्भातील माहिती कंपनीने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना १जीबी ३जी/४जी डेटा देण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही नेटवर्कवर एका तासासाठी व्हॉईस कॉलिंग करता येणार आहे. मात्र, याची वैधता केवळ २ दिवसच असणार आहे. तसेच हा प्लॅन गुजरात सर्कलमधील ग्राहकांसाठीच असणार आहे असेही कंपनीने सांगितले आहे.

रिलायन्स कम्युनिकेशनने आपल्या ग्राहकांना २जी हून ४जी मध्ये अपग्रेड होण्यास सांगितलं आहे. अन्यथा ग्राहकांना सेवेत अडथळा निर्माण होऊ शकतो.