जिओचा जबरदस्त प्लॅन ; वर्षभर फ्रि 750GB डेटा आणि बरंच काही....

रिलायन्स जिओ सातत्याने नवनवे प्लॅस सादर करत आहेत. 

Darshana Pawar | Updated: Dec 7, 2017, 11:38 AM IST
जिओचा जबरदस्त प्लॅन ; वर्षभर फ्रि 750GB डेटा आणि बरंच काही....

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ सातत्याने नवनवे प्लॅस सादर करत आहेत. 

काय आहे प्लॅन ?

नुकताच जिओने एक प्लॅन सादर केला, त्यात फ्री कॉलिंग आणि 750GB डेटा मिळत आहे. मात्र गूगल पिक्सल 2 स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी हा प्लॅन असेल. या प्लॅनमधून कोणत्याही नेटवर्कला फ्री कॉलिंग, तसंच STD आणि रोमिंग फ्री मिळेल. ही ऑफर एक वर्षापर्यंत चालू राहील. त्यासोबतच 750GB डेटा फ्री मिळेल. फ्री जिओ अॅप्ससोबत नॅशनल आणि लोकल मेसेज देखील फ्री मिळेल. ही ऑफर ९,९९९ रूपयांना उपलब्ध आहे. 

डिस्काउंट ऑफर

रिलायन्स जिओच्या या ऑफरवर डिस्काउंट ऑफर देखील मिळेल. HDFC बॅंकेच्या क्रेडीट कार्डने पेमेंट केल्यास ८००० पर्यंत कॅशबॅक मिळेल.  हा प्लॅन घेतल्यानंतर गूगल पिक्सल 2 खरेदी करताना जुना फोन एक्सचेंज करू शकता. त्यावर ५००० रुपयांचा अॅडीशनल बोनस मिळेल. तसे पाहायला गेले तर या ऑफरमधून ग्राहकांना २२,९९९ रूपयांचा फायदा मिळेल.

जिओच्या ऑफर अजून संपल्या नाहीत. गूगल पिक्सल 2 आणि पिक्सल 2 XL हे गूगलचे फ्लॅगशिप फोन आहेत. ही ऑफर दोन्ही फोनवर उपलब्ध आहे. पिक्सल 2 ची किंमत ६१,००० रुपये तर पिक्सल 2 XL ची ७३,००० रुपये किंमत आहे.

काय आहे फोनची खासियत?

  • गूगल पिक्सल 2 आणि पिक्सल 2 XL हे फोन अॅनरॉईड ८.० वर काम करतात. 
  • फोनमध्ये स्नॅपड्रगनचा ऑक्टा कोर प्रोसेसर आहे.
  • फोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले आहे. त्याचे रिजोल्यूशन 1920x1080 पिक्सल्स आहे.
  • डिस्प्लेसाठी कॉर्निग ग्लास 5 चे प्रोटेक्शन दिले आहे. 
  • LED फ्लॅशसोबत 12.2MP चे रियर आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
  • फास्ट चार्जिंग होत असलेल्या या फोनची बॅटरी 2700mAh आहे.