रिलायन्स JIO चा बंपर धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही फ्री, आणि १००% कॅशबॅक

टेलिकॉम इंडस्ट्रीतलं युद्ध संपण्याचं नाव घेत नाहीय. दोन वर्षाआधी रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यापासून हे युद्ध सुरू झालं आहे.

Updated: Nov 14, 2018, 01:20 PM IST
रिलायन्स JIO चा बंपर धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही फ्री, आणि १००% कॅशबॅक title=

मुंबई : टेलिकॉम इंडस्ट्रीतलं युद्ध संपण्याचं नाव घेत नाहीय. दोन वर्षाआधी रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यापासून हे युद्ध सुरू झालं आहे. पण या मोबाईल कंपन्यांच्या भांडणीत मोबाईल ग्राहकाचा मोठा फायदा होत आहे. सध्या मोफत कॉलिंग आणि फ्री डाटा देण्याच्या या युद्धात, सर्व मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकाला सर्वोत्तम आणि ग्राहकाच्या खिशाला कमीत कमी धक्का लागेल, असा प्लान ऑफर करीत आहेत. या स्पर्धेत टेलिकॉम इंडस्ट्रीत अनेक मोठे बदल पाहायला मिळाले, या स्पर्धेत टिकण्यासाठी दोन कंपन्या एकत्र येताना दिसल्या, तर काहींना कंपनीचं शटर बंद केलं.

जाणून घ्या प्लानची माहिती, सोप्या शब्दात

दिवाळी संपताना का असेना, रिलायन्सने एक धमाकेदार प्लान ठेवला आहे. या प्लानचा फायदा अजून देखील तुम्हाला घेता येईल. फक्त या प्लान जिओच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. कंपनीने या प्लानला जिओ दिवाली धमाका नाव दिलं आहे. 

यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जिओ आपल्या यूझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर देखील देणार आहे. अट अशी आहे की वर्षभरासाठी हा प्लान आपण घेतला तर वर्षभराचे पैसे कॅशबॅकमध्ये दिले जाऊ शकतात.

काय आहे नेमका प्लान

JIO च्या या प्लानची किंमत १६९९ रूपये आहे. प्लानची मुदत १ वर्ष आहे. एका वर्षासाठी जिओ युझर्सला मोफत कॉलिंग आणि फ्री डाटा मिळेल. या प्लानमध्ये युझर्सला दररोज दीड जीबी डाटा देण्यात येईल. यानुसार वर्षभर एकूण 547.5GB डाटा मिळेल.

आता पाहा कॅशबॅक कशी मिळेल

जिओने आपल्या युझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर दिली आहे. प्लानवरील कॅशबॅक ऑफर रिलायन्स डिजिटल कूपन्सच्या स्वरूपात मिळणार आहे. हे कूपन्स युझर्स माय जिओ अॅपच्या माध्यमातून वापरू शकतात. हे कूपन आपोआप युझर्सच्या अॅपमध्ये सेव्ह होईल.

कॅशबॅक वसूल करण्याची शेवटची तारीख

याचा उपयोग तुम्ही पुन्हा रिचार्जसाठी करू शकतात. कॅशबॅकच्या स्वरूपात मिळणारे हे कूपन्स ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत वापरावे लागतील. या कॅशबॅकचा वापर तुम्ही रिलायन्स डिजिटलच्या स्टोअरवर देखील करू शकतात. पण यासाठी युझर्सला कमीत कमी ५ हजार रूपयांपर्यंतची खरेदी करावी लागणार आहे. ही खरेदीची मर्यादा जरा जास्त वाटतेय.

मोबाईलच्या कोणत्याही प्लानची एकदा स्वत: माहिती काढा, आणि त्यानंतरच रिचार्ज करा.