जिओ गिगाफायबरची जबरदस्त ऑफर, ३ महिने १.१ टीबी डेटा फ्री

रिलायन्स जिओनं ब्रॉडबँड सेवा जिओ गिगाफायबरच्या नोंदणीला १५ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे.

Updated: Aug 19, 2018, 08:51 PM IST
जिओ गिगाफायबरची जबरदस्त ऑफर, ३ महिने १.१ टीबी डेटा फ्री title=

मुंबई : रिलायन्स जिओनं ब्रॉडबँड सेवा जिओ गिगाफायबरच्या नोंदणीला १५ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. दिवाळीपर्यंत ही सेवा सुरु होण्याचा अंदाज आहे. ज्या शहरांमध्ये सर्वाधिक नोंदणी होईल तिकडून गिगाफायबर सेवेची सुरुवात होईल. देशातल्या ११०० शहरांमध्ये ही सेवा सुरु होणार आहे. गिगाफायबर लॉन्च होण्याच्या आधीच याच्या ऑफरची माहिती समोर येत आहे. जिओ गिगाफायबर सेवा तीन महिन्यांसाठी प्रिव्ह्यू ऑफर सोबत लॉन्च होऊ शकते. कंपनीनं त्यांच्या वेबसाईटवर प्रिव्ह्यू ऑफरची माहिती दिली आहे.

प्रिव्ह्यू ऑफरमध्ये काय मिळणार?

कंपनीनं वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार गिगाफायबर प्रिव्ह्यू ऑफरमध्ये यूजरला १०० एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. यामध्ये यूजरला महिन्याभरासाठी १०० जीबी डेटा वापरता येईल. १०० जीबी डेटा वापरल्यानंतर यूजरला आणखी डेटाही फ्रीमध्ये मिळणार आहे. यामध्ये यूजरच्या अकाऊंटमध्ये ४० जीबी डेटा जोडला जाईल. याला डेटा टॉप-अपच्या माध्यमातून जोडलं जाईल.

१.१ टीबी डेटा फ्री

१०० जीबी डेटा संपल्यानंतर टॉप-अप करून ४० जीबी टेडा मिळेल. यानंतरही यूजरला एका महिन्यात २५ वेळा टॉप-अप करून डेटा मिळू शकतो, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. म्हणजेच महिन्याला एकूण १.१ टीबी डेटा फ्री मिळेल. प्रिव्ह्यू ऑफरबाबत कंपनीनं अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सुरुवातीला पैसे भरावे लागणार

जिओ गिगाफायबरच्या सेवेसाठी सुरुवातीला ४,५०० रुपये भरावे लागणार आहेत. हे पैसे यूजरला परत मिळणार आहेत. जिओ गिगाफायबरसोबत जिओ गिगा टीव्ही, स्मार्ट होम अशा सुविधा फ्री देण्यात येणार आहेत. यूजरला महिन्याच्या वापरासाठी ४,५०० हजार रुपयांपेक्षा जास्त कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही.

जिओची प्रिव्ह्यू ऑफर तीन महिन्यांची आहे. जर यूजरला ३ महिन्यांनंतर सेवा बंद करायची असेल तर त्यानं भरलेले ४,५०० हजार रुपये परत मिळणार आहेत. पण सेट टॉप बॉक्स सुस्थितीत असेल तरच पूर्ण पैसे मिळतील, अशी अट जिओनं घातली आहे.

५ कोटी ग्राहक बनवण्याचं लक्ष्य

रिलायन्स जिओचं ५ कोटी ग्राहक बनवण्याचं लक्ष्य आहे. या कारणासाठीच कंपनी सुरुवातीला ३ महिने प्रिव्ह्यू ऑफर देईल. सध्या बीएसएनएल ही भारतातली एकमेव कंपनी आहे ज्यांच्याकडे १० कोटीपेक्षा जास्त ब्रॉडबॅण्ड ग्राहक आहेत.