रिलायन्स जिओकडून ग्राहकांना ३ खुशखबर

जिओ पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी खूशखबर घेऊन आला आहे. जिओ आपल्या ग्राहकांना लवकरच सरप्राईज देणार आहे. जिओकडून ग्राहकांना ३  खुशखबरी मिळणार आहे.

Updated: Jun 12, 2017, 10:04 AM IST
रिलायन्स जिओकडून ग्राहकांना ३ खुशखबर title=

मुंबई : जिओ पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी खूशखबर घेऊन आला आहे. जिओ आपल्या ग्राहकांना लवकरच सरप्राईज देणार आहे. जिओकडून ग्राहकांना ३  खुशखबरी मिळणार आहे. पहिली खुशखबर ही आहे की, जिओने इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत 19.12 एमबीपीएसचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. जिओने डाउनलोडिंग स्पीडमध्ये सर्व कंपन्यांना मागे टाकलं आहे. जिओने 18.48 एमबीपीएसचं स्वत:चाच रेकॉर्ड मोडला आहे.

दुसरी खुशखबर म्हणजे दिवाळीत रिलायंस जिओ आपली फायबर ब्रॉडबँड सर्विस लॉन्च करणार आहे. ज्याची प्रतिक्षा अनेकांना आहे. जिओ 500 रुपयेमध्ये 100 जीबी डेटाची ऑफर देऊ शकते. यामुळे टेलीकॉम सेक्टरमध्येही प्राईस आणि डेटा वॉर सुरू होऊ शकतो. ज्याचा सरळ फायदा ग्राहकांनाच होणार आहे.

तिसरी खुशखबर म्हणजे कंपनीने कमी किंमतीत फीचर फोन लॉन्च करण्याची तय़ारी केली आहे आणि जिओच्या या फीचर फोनची किंमत 1500 च्या आत असू शकते.