बुलेट खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या ठिकाणी मिळेल स्वस्त आणि मस्त बुलेट

दुचाकी वाहनांच्या खरेदीदारांपैकी अनेकजण बुलेटला जास्त पसंती देतात. बुलेटची शान आणि बुलेट असणाऱ्यांचा एक वेगळाच मान असतो. त्यामुळे या बुलेटला मोठी मागणी असल्याचं पहायला मिळतं. तुम्हीही बुटेलप्रेमी आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 8, 2018, 08:03 PM IST
बुलेट खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या ठिकाणी मिळेल स्वस्त आणि मस्त बुलेट  title=

चेन्नई : दुचाकी वाहनांच्या खरेदीदारांपैकी अनेकजण बुलेटला जास्त पसंती देतात. बुलेटची शान आणि बुलेट असणाऱ्यांचा एक वेगळाच मान असतो. त्यामुळे या बुलेटला मोठी मागणी असल्याचं पहायला मिळतं. तुम्हीही बुटेलप्रेमी आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

स्वस्तात बुलेट खरेदी करण्याची संधी

बुलेटची किंमत अधिक असल्याने अनेकांना खरेदी करता येत नाही. मात्र, आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण, कंपनीने असं एक स्टोअर सुरु केलं आहे ज्या ठिकाणी बुलेट स्वस्तात तुम्हाला मिळणार आहे.

'विंटेज स्टोअर'ची सुरुवात

प्रीमिअर मोटरसायकल बनवणारी रॉयल इनफील्ड (Royal Enfield) कंपनीने जुन्या मोटरसायकल विकण्याच्या बाजारात पाऊल ठेवलं आहे. यासाठी कंपनीने एक स्टोअर सुरु केलं आहे. या स्टोअरला 'विंटेज स्टोअर' असं नाव देण्यात आलं आहे.

Royal Enfield, Bullet, Bullet second hand bike, Vintage store, bullet Vintage store, बुलेट विंटेज स्टोर

एक नवी कल्पना

कंपनीने हे 'विंटेज स्टोअर' चेन्नईत सुरु केलं आहे. भविष्यात अशा प्रकारचे स्टोअर्स देशभरात सुरु करण्याचा कंपनीचा विचार आहे. विंटेज स्टोअर ही एक नवी कल्पना आहे ज्या ठिकाणी जुन्या आणि महागड्या बाईक ग्राहकांना स्वस्तात उपलब्ध होणार आहेत.

जुन्या गाड्यांची चांगली मागणी 

ज्या ग्राहकांना जुनी आणि चांगली रॉयल एनफील्ड खरेदी करायची आहे त्या ग्राहकांसाठी ही एक चांगली संधी आहे. रॉयल एनफील्डचे प्रमुख (इंडिया बिजनेस) शाजी कोशी यांनी पहिल्या स्टोअरचं उद्घाटन केल्यानंतर म्हटलं, "जुन्या आणि चांगल्या रॉयल एनफील्डची चांगली मागणी आहे त्यामुळे आम्ही हा एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे जेथे एका ग्राहकाकडून दुसऱ्या ग्राहकाला मोटरसायकल उपबल्ध होणार आहे."

Bullet के दीवानों के लिए खुशखबरी! कंपनी यहां सस्ते में मुहैया कराएगी मोटर साइकिल

१० स्टोअर्स सुरु करण्याची योजना

कोशी यांनी पुढं म्हटलं की, येत्या काळात कंपनीतर्फे १० नवे स्टोअर्स सुरु करण्याची योजना आहे. या विंटेज स्टोअरमध्ये केवळ रॉयल एनफील्ड मोटरसायकलची विक्री केली जाणार आहे. तसेच या शॉप्समध्ये मोटरसायकल खरेदी करण्यासाठी कर्ज देण्याचीही योजना असणार आहे.