सॅमसंग 'गॅलॅक्सी नोट ८' लाँच

सॅमसंगचा बहुप्रतिक्षित नोट ८ अखेर आज लाँच झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनची चर्चा सुरु होती. 

Updated: Aug 23, 2017, 10:26 PM IST
सॅमसंग 'गॅलॅक्सी नोट ८' लाँच title=

नवी दिल्ली : सॅमसंगचा बहुप्रतिक्षित नोट ८ अखेर आज लाँच झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनची चर्चा सुरु होती. 

सॅमसंग गॅलॅक्सी नोट ८ हा नोट सीरिजमधील पहिली ड्युअल रेयर कॅमेरा हँडसेट आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये ६.३ इंचाचा इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आलाय.

सॅमसंग गॅलॅक्सी नोट ८चे फीचर्स

६.३ इंचाचा क्वाड एचडी सुपर एमोले़ डिस्प्ले
८ मेगापिक्सेल फ्रँट कॅमेरा
१२ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
अँड्रॉईड ७.१.१
बॅटरी ३३०० एमएएच
१.६ गिगाहर्टझ ओक्टाकोर
६ जीबी रॅम
६४, १२८ आणि २५६ जीबी इंटरनल मेमरी