गॅलॅक्सी नोट ८ होणार २३ ऑगस्टला लॉन्च!

 सॅमसंगचा नवा गॅलॅक्सी नोट ८  हा फोन बाजारात लॉन्च होतोय. लॉन्चसाठी अवघे काही दिवस उरले असताना स्मार्टफोनबद्दलच्या काही गोष्टी वाऱ्यासारख्या पसरत आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 21, 2017, 06:35 PM IST
गॅलॅक्सी नोट ८ होणार २३ ऑगस्टला लॉन्च! title=

मुंबई : सॅमसंगचा नवा गॅलॅक्सि नोट ८  हा फोन बाजारात लॉन्च होतोय. लॉन्चसाठी अवघे काही दिवस उरले असताना स्मार्टफोनबद्दलच्या काही गोष्टी वाऱ्यासारख्या पसरत आहेत.

गॅलॅक्सी नोट ८ च्या काही फीचर्सची माहिती करून घेऊया. 
गॅलॅक्सी नोट ८  च्या फीचर्सची माहिती देणारे दोन टीजर व्हिडिओज सॅमसंगने साऊथ कोरियाच्या युट्युब चॅनेलवर पोस्ट केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये Galaxy Note 8 च्या ड्युअल कॅमेरा सेटअप फिचरबद्दल सांगितले आहे. वृत्तानुसार Galaxy Note 8 मध्ये २x किंवा ३x ऑप्टिकल झूम असेल. 

 दुसऱ्या व्हिडीओमध्ये गॅलॅक्सी नोट ८ सोबत येणाऱ्या S-Pen बद्दल दाखवण्यात आले आहे. stylus pen २०१५ मध्ये लॉन्च झाले.गॅलॅक्सी नोट ५ सोबत त्याचे लान्चिंग झाले होते.  S-Pen हे गॅलॅक्सी नोट ८ चे खास फीचर आहे. यंदा ते फीचर नव्या पद्धतीने डिजाईन करून सादर केले जाईल. 
 गॅलॅक्सी नोट ८ ला AnTuTu आणि GFXBench या बॅचमार्कींग साईटवर लिस्ट करण्यात आले आहे. त्यात फोनच्या सगळ्या फिचर्सची माहिती उपलब्ध आहे. गॅलॅक्सी नोट ८ हा ६ जीबी रॅम असलेला नोट सिरीजमधील पहिला स्मार्टफोन असेल. त्याचे रिजोल्यूशन १०८०×२२२० पिक्सल असून ६.४ इंच डिस्प्ले असेल. कंपनी या फोनला दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करू शकेल. ज्यात एक व्हेरियंट क्वालकॉम स्पॅनड्रॅगन ८३५ चिपसेट अॅड्रीना ५४० जीपीयू असेल तर दुसरे व्हेरियंट एक्सनोस ८८९५ चिपसेट सोबत Mali G71 जीपीयू असण्याची शक्यता आहे. तसंच यात ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असू शकेल. 

गॅलॅक्सी नोट ८ मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एक १३ मेगापिक्सलचा आणि एक १२ मेगापिक्सल सेन्सर असेल. पॉवर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये ३३०० एमएएच बॅटरी असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉईड ७. १. १ नॉगट वर सादर होईल. कंपनी सॅमसंग गॅलॅक्सी नोट ८ हा स्मार्टफोन २३ ऑगस्टला आयोजित केलेल्या 'Unpacked press event’ मध्ये सादर करणार आहेत.