'सॅमसंग' कंपनीच्या वारसदाराला पाच वर्षांचा तुरुंगवास

दक्षिण कोरियातील एका न्यायालयाने सॅमसंग कंपनीचे वारसदार ली जे योंग यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात योंग यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 25, 2017, 06:27 PM IST
'सॅमसंग' कंपनीच्या वारसदाराला पाच वर्षांचा तुरुंगवास title=

दक्षिण कोरिया : दक्षिण कोरियातील एका न्यायालयाने सॅमसंग कंपनीचे वारसदार ली जे योंग यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात योंग यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

जगातील प्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी असलेल्या सॅमसंग कंपनीचे ली जे योंग हे वारसदार आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. मात्र, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

ली जे योंग यांच्यावर ४ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास २५६ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप होता. या आरोपांवरून त्यांना ५ वर्षांची कैद सुनावण्यात आली आहे.

पार्क ग्यून हाय या दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या बालपणीच्या मैत्रीण आणि सल्लागार चोई सून सिल यांनी विविध कंपन्यांकडून कोट्यवधींची लाच घेतली होती. याच प्रकरणात पार्क ग्यून यांना राष्ट्राध्यक्षपद सोडावे लागले होते.

न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात ली जे योंग यांचे वकील सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याच्या तयारीत आहेत.