ही बडी कंपनी भारतात टीव्ही बनवणं बंद करणार

भारतातून टीव्हीचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय बड्या कंपनीनं घेतला आहे.

Updated: Sep 3, 2018, 09:10 PM IST
ही बडी कंपनी भारतात टीव्ही बनवणं बंद करणार

चेन्नई : भारतातून टीव्हीचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय बड्या कंपनीनं घेतला आहे. दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगनं टीव्ही उत्पादन भारताबाहेर नेण्याची योजना बनवली आहे. सध्या सॅमसंगच्या चेन्नई यूनिटमधून भारतात टीव्ही बनतात. पण कंपनी आता व्हिएतनाममधून भारतात टीव्ही आयात करेल. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार कंपनीनं स्थानिक सप्लायरना याबाबत कल्पना दिलेली आहे. चेन्नईमधल्या यूनिटमधून सॅमसंगच्या ३ लाख टीव्हींचं उत्पादन होतं.

आयात शुल्क वाढवल्यामुळे नाराजी 

या वृत्तानुसार बजेटमध्ये टीव्ही पॅनल बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सवर आयात शुल्क वाढवण्यात आलं. यामुळे कंपनी नाराज झाल्याचं बोललं जातंय. बजेटमध्ये टीव्ही पॅनल बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ओपन सेलवर १० टक्के आयात शुल्क वाढवण्यात आलं होतं. पण अनेक कंपन्यांनी विरोध केल्यानंतर हे शुल्क घटवून अर्ध्यावर करण्यात आलं. २०१६-१७ या वर्षामध्ये सॅमसंगला भारतात ८ अरब डॉलरचं महसुली उत्पन्न मिळालं होतं. 

नोएडात जगातली सगळ्यात मोठी कंपनी 

कोरियाच्या या कंपनीनं नोएडामध्ये मोबाईल फोन बनवण्याची क्षमता ६७ लाखांवरून १.२ कोटी युनिट केली आहे. ही जगातली सगळ्यात मोठी मोबाईल फोन बनवणारी कंपनी आहे, असं सॅमसंगचे सीईओ एचसी हॉन्ग यांनी सांगितलं होतं. आम्ही भारतात भारतीयांसाठीच नाही तर जगासाठी मोबाईल बनवत आहोत. आम्ही भारत सरकारच्या नितींसोबत आहोत आणि भारताला मोबाईल फोन निर्यातीचं हब बनवण्याचं स्वप्न असल्याचं कंपनीनं सांगितलं होतं. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close