मारूती सुझूकीची नवी Swift Hybrid येणार, फीचर्स आणि किंंमत काय ?

मारूती सुझूकीने त्यांची लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्टचं हायब्रिड व्हर्जन लॉन्च केलं आहे. 

Updated: Aug 7, 2018, 04:31 PM IST
मारूती सुझूकीची नवी Swift Hybrid येणार, फीचर्स आणि किंंमत काय ?

मुंबई : मारूती सुझूकीने त्यांची लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्टचं हायब्रिड व्हर्जन लॉन्च केलं आहे. इंडोनेशियामध्ये पार पडलेल्या ऑटो शोमध्ये या कारची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. स्विफ्ट्चं हे पहिलेच हायब्रिड व्हर्जन नाही. जपानमध्येही जुलै 2017 साली मारुती सुझूकीचं हायब्रीड व्हर्जन लॉन्च करण्यात आलं होतं. लवकरच ही कार भारतीय बाजारातही दाखल होण्याची शक्यता आहे. 

कधी होणार लॉन्च, काय असेल किंमत ? 

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतामध्ये 2019 साली स्विफ्ट हायब्रिड लॉन्च केली जाणार आहे. पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात ही कार बाजारात येऊ शकते. या कारची किंमत अंदाजे 7 लाख असण्याची शक्यता आहे. 

कसे असेल कारचे इंजिन ? 

स्विफ्ट हायब्रिडमध्ये एक पेट्रोल इंजिन आणि एक इलेक्ट्रिक मोटार असेल. तसेच 5 एएमटी म्हणजेच ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन असेल. 1,2 लीटरचं पेट्रोल इंजिन सुमारे 91PS/118Nm टॉर्क जेनरेट करणार आहे. भारतीय स्विफ्ट पेट्रोल मॉडलमध्ये K12B इंजिन देण्यात येणार आहे. हे इंजिन  1197ccचं असेल. इंजिन 83PS/113Nm टॉर्क जनरेट करणार आहे.  

इलेक्ट्रिक मोटार 

सुझुकी स्विफ्ट हायब्रिडमध्ये इलेक्ट्रिक मोटार आहे. त्याची पॉवर सुमारे 13.6 पीएस आणि 30 न्यूटन मीटर टॉर्क जेनरेट करते. त्यामध्ये 100 वोल्ट लिथियम आयन बॅटरीची पॉवर आहे. स्विफ्ट हायब्रिड कार 32kmpl चं मायलेज देते. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, हा मायलेज रेट भारतामध्ये सध्या धावत असलेल्या स्विफ्ट (पेट्रोल) कारच्या तुलनेत 10 kmpl अधिक आहे. 

लुक्समध्ये फारसा फरक नाही 

सामान्य स्विफ्ट कार आणि हायब्रिड स्विफ्ट कार यांच्या लूक्समध्ये फारसा फरक नाही. हायब्रिड मॉडलमध्ये हनीकॉम्ब मॅश फ्रंट ग्रिल आणि फ्रंट फेंडर वर हायब्रिड बॅजिंग देण्यात आलं आहे. त्यामुळे लुक्समध्ये फारसा फरक नाही. 

कसे असेल इंटिरियर ? 

स्विफ्ट हायब्रिडमध्ये हनी कॉम्ब मेश फ्रंट ग्रिल आहे. गियरला निळा रंग आणि इंसर्ट्ससोबत लेस असेल. इंस्ट्रूमेंट क्लस्टरवरदेखील निळ्या रंगाची लाईट असेल. सुझुकीने या कारला लेजर्स आणि कॅमेर्‍यांचा समावेश केला आहे. ड्युअल सेंन्सॉर ब्रेक सपोर्टचा समावेश करण्यात आला आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close