सोशल मीडियावर तत्वत: व्हायरल

सोशल मीडियावर तत्वत: शब्द व्हायरल झाला आहे. सरकारने तत्वत: कर्जमाफीचा देण्याचा निर्णय सुकाणू समितीने मान्य केला खरा.

Updated: Jun 11, 2017, 11:05 PM IST
सोशल मीडियावर तत्वत: व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर तत्वत: शब्द व्हायरल झाला आहे. सरकारने तत्वत: कर्जमाफीचा देण्याचा निर्णय सुकाणू समितीने मान्य केला खरा...पण तत्वत: म्हणजे काय? हा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला आहे. 

'ती माझ्याशी लग्न करण्यास तत्वत: तयार आहे, पण लग्नाची तयारी करण्याआधी काही निकष ठरवायचे आहेत', असे भन्नाट जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तत्वत: शब्दाचा वापर करून मोठ्या प्रमाणात कल्पना लिहिल्या जात आहेत.

शेतकऱ्यांना कशी कर्जमाफी मिळणार आहे, किंवा नाही हे चित्र जरी स्पष्ट झालं नसलं, तरी तत्वत: हा शब्द आणि कल्पना मात्र व्हायरल होत आहेत हे मात्र निश्चित...