एअरटेलचे ढासू प्लान्स...दिवसाला मिळेल २.५ जीबी डेटा

टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स जिओ आल्यानंतर इतर कंपन्या स्वस्तात मस्त असे इंटरनेट प्लान सादर करतायत. एअरटेलनेही आपले अनेक प्लान्स नव्याने काही बदलांसह सादर केलेत. एअरटेलने आपल्या १९९, ३४९, ४४८ आणि ५०९ रुपयांचे प्लान नव्याने सादर केलेत. 

Updated: Feb 24, 2018, 12:49 PM IST
एअरटेलचे ढासू प्लान्स...दिवसाला मिळेल २.५ जीबी डेटा title=

मुंबई : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स जिओ आल्यानंतर इतर कंपन्या स्वस्तात मस्त असे इंटरनेट प्लान सादर करतायत. एअरटेलनेही आपले अनेक प्लान्स नव्याने काही बदलांसह सादर केलेत. एअरटेलने आपल्या १९९, ३४९, ४४८ आणि ५०९ रुपयांचे प्लान नव्याने सादर केलेत. 

दिवसाला १.४ जीबी डेटा

नव्या ऑफर अंतर्गत एअरटेलच्या ग्राहकांना १९९ रुपयांमध्ये २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह दिवसाला १.४ जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय या प्लानमध्ये दिवसाला १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत. याचप्रमाणे ४४८ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनीकडून ८२ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला १.४ जीबी डेटा आणि १०० एसएमएस फ्री. याप्रमाणेच ५०९ रुपयांच्या प्लानमध्ये या सुविधा ९० दिवसांसाठी आहेत.

३४९ रुपयांचा प्लान केला अपग्रेड

एअरटेलने ३४९ रुपयांचा प्लानही अपग्रेड केलाय. या प्लानमध्ये एअरटेलकडून ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये दिवसाला २.५ जीबी डेटा मिळेल. त्याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसचीही सुविधा मिळते. 

एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी दररोज एक जीबी डेटा देतेय. याची व्हॅलिडिटी ७० दिवसांची आहे. या हिशेबानुसार एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ७० जीबी डेटा युजर्सला मिळणार आहे. यासोबतच १९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये दररोज १.४ जीबी डेटा २८ दिवसांसाठी मिळतो.