गूगलचे 'हे' अॅप बंद होणार

Allo अॅप मार्च 2019 पर्यंत सुरु असेल.   

Updated: Dec 6, 2018, 07:50 PM IST
गूगलचे 'हे' अॅप बंद होणार

मुंबई | गूगलकडून युझर्सना नवनवीन सेवा देण्याचा मानस असतो. गूगलने एक मेसेंजर अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गूगल Allo असे या अॅप्लिकेशनचे नाव आहे. या अॅपला युझर्सकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Allo अॅप मार्च 2019 पर्यंत सुरु असेल. तोपर्यंत युजर्स अॅपवरील मेसेजेसचा बॅकअप घेऊ शकतात, अशी माहिती गूगलने दिली. मशिन लर्निंगवर आधारित असलेले फिचर्स आणि गूगल असिस्टंटला मेसेंजर अॅपमध्येच इनबिल्ट करणं, या बाबी आम्ही, Allo अॅपद्वारे शिकलो, असे गुगलने सांगितलं. यंदा एप्रिल महिन्यापासूनच Allo अॅप मध्ये गुंतवणूक करणे बंद केले होते. या अॅपमध्ये अनेक फिचर्स उपल्बध होते. पण तरीही व्हॉटसअॅप समोर Allo ला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

अॅप्लिकेशन बंद होण्याचे कारण

इतर मेसेंजर अॅपप्रमाणे, या मेसेंजर अॅपमध्ये कॉलिंगची सोय नसल्याने या अॅपकडे युजर्सनी दुर्लक्ष केले. या अॅपच्या माध्यामातून युजर्सना फोटो आणि स्टीकर्स पाठवण्याची सोय होती. पण या अॅपद्वारे एखादी फाईल किंवा डॉक्युमेंट पाठवण्यासाठी सोय नसल्याने इतर मेसेंजरच्या तुलनेत हे अॅप मागे पडले. Allo इतर अॅपच्या तुलनेत हाताळण्यासाठी किचकटही होते.

असा घ्या बॅकअप

अॅप बंद होत असल्याने युजर्सना आपल्या डेटाची गरज असते. युजर्स डेटा बॅकअॅप मार्च 2019 पर्यंत घेऊ शकतात. बॅकअॅप घेण्याची प्रकिया फार सोपी आहे. चॅट हिस्ट्रीचा बॅकअॅप घेण्यासाठी Allo अॅपच्या सेटींग मध्ये जाऊन चॅट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मेसेज बॅकअप आणि मेसेज सोबतच फोटो आणि व्हिडीओ बॅकअॅप असे दोन पर्याय येतील. पहिला ऑप्शन निवडल्यावर फक्त मेसेजचा बॅकअॅप डेटा मिळेल. तर दुसरा पर्याय सेलेक्ट केल्यावर युजर्सना त्यांचा सर्व डेटा मिळेल.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close