नको असलेल्या कॉल्सपासून सुटका, केंद्र सरकारचे नवे अॅप

अनेक वेळा आपल्या मोबाईलवर कधीही अनावश्यक कॉल्स येतात. कधी कंपनीचे कॉल असतात. मात्र, या त्रासदायक कॉल्सपासून सुटका होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 7, 2018, 11:19 PM IST
नको असलेल्या कॉल्सपासून सुटका, केंद्र सरकारचे नवे अॅप

नवी दिल्ली : अनेक वेळा आपल्या मोबाईलवर कधीही अनावश्यक कॉल्स येतात. कधी कंपनीचे कॉल असतात. मात्र, या त्रासदायक कॉल्सपासून सुटका होणार आहे. केंद्र सरकारने नवी अॅपची निर्मिती केलेय. उमंग व्यासपीठावर डीएनडी २.० नावाचे अॅप ट्रायकडून मंगळवारी सादर करण्यात आलेय.

 नको असलेल्या फोन कॉल्सपासून मुक्ती

प्लेस्टोअवर जाऊन हे नवीन अॅप डाऊनलोड करा आणि आपल्या मोबाईलमध्ये या सुविधेचा वापर करा. त्यामुळे अनावश्यक कॉलपासून सुटका होणार आहे, असे लाँचिंग दरम्यान ट्रायकडून सांगण्यात आले. उमंग या व्यासपीठावरुन हे अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. इतर कोणतेही अॅप नको असलेले फोन कॉल्सपासून मुक्ती मिळण्यास याच अॅपचा उपयोग करता येणार आहे.

 टेलिकम्युनिकेशन मार्केटींग कंपन्या ग्राहकांना मोबाईवर फोन करुन आपल्या कंपनीच्या सुविधाची माहिती देण्यात प्रयत्न करत असता. अनेकवेळा झोपेच्यावेळेत असे कॉल येतात. त्यामुळे झोपमोड होते. यातून सुटका होण्याकरिताच ट्रायने मागील वर्षी 'माय स्पीड' आणि 'माय कॉल' या नावाvs अॅप लॉच करण्यात आले होते.

 काय आहे हे अॅप?

डिजिटल इंडियाचे प्रमोशन आणि एक सरकारी सेवा देणारी यंत्रणा यांना एकाच पातळीवर समातर ठेवण्याकरिता मागील वर्षांपासून केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. यात मागील जूनमध्ये उमंग अॅप लाँच करण्यात आले होते. सुरुवातीला गॅस बुकिंग, सरकारी दवाखाने आणि महत्वाच्या सेवाकरिता आठ सुविधाचा समावेश या अॅपमध्ये करण्यात आला होता, असे स्पष्टीकरण ट्रायकडून देण्यात आलेय. आणखी १०० हून जादा सुविधाचा या अॅपमध्ये समावेश करण्यात आलाय.  

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close