टीव्हीएस अपाचे नव्या मॉडेलची लॉन्च डेट ठरली, जाणून घ्या फिचर्स

टीव्हीएसची सर्वात लोकप्रिय बाईकचा नवा अवतार TVS Apache RR 310 भारतात येत्या ६ डिसेंबरला लॉन्च होणार आहे.

Updated: Nov 22, 2017, 02:33 PM IST
टीव्हीएस अपाचे नव्या मॉडेलची लॉन्च डेट ठरली, जाणून घ्या फिचर्स title=
Image Source: Rushlane

नवी दिल्ली : टीव्हीएसची सर्वात लोकप्रिय बाईकचा नवा अवतार TVS Apache RR 310 भारतात येत्या ६ डिसेंबरला लॉन्च होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या बाईकची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर या बाईकची लॉन्च डेट जाहीर झाली आहे. 

लाल आणि निळ्या रंगात होणार उपलब्ध

नवीन Apache RR 310 ही बाईक भारतात ६ डिसेंबर २०१७ ला लॉन्च होणार आहे. ही बाईक लाल आणि निळ्या रंगांमध्ये उपलब्ध होईल. टीव्हीएसने अपाचेचं नवं मॉडल अकूला ३१० चं कॉन्सेप्ट मॉडल २०१६ मध्ये दिल्लीच्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर केलं होतं. 

टीव्हीएस अपाचे आरआर ३१० चे फिचर्स

या बाईकमध्ये ट्विन प्रोजेक्टर हेडलाईट्स आणि एलईडी टेल लॅम्प्स दिले आहेत. मोठी फ्यूल टॅंक असलेल्या या बाईकचा मागील भाग उंच आहे. बाईकच्या मागचा खालील भाग शार्क फिनसारख्या डिझाईनचा आहे. तसेच यात स्पिलट सीट दिली जाईल. स्पोर्टी लूक असलेल्या या बाईकमध्ये टीव्हीएसने रायडिंग पोझिशनला अधिक चांगलं करण्यावर भर दिलाय. TVS Apache RR 310S मध्ये १७ इंच अलॉय व्हिल असू शकतात. यात स्टॅंडर्ड फिचर म्हणून अ‍ॅंटी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम दिली जाऊ शकते.  

इंजिन, पॉवर आणि स्पेसिफिकेशन्स 

TVS Apache RR 310S मध्ये सिंगल सिलेंडर DOHC लिक्वीड कूल्ड फ्यूल इंजेक्टेड इंजिन दिलं जाणार आहे. हे इंजिन बीएमडब्ल्यूने BMW G310R बाईकमध्ये दिलं आहे. हे इंजिन ९,५०० आरपीएमवर जास्तीत जास्त ३३.५ बीएचपीची पावर आणि ७,५०० आरपीएमवर २८ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. ट्रान्समिशनसाठी या बाईकमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलाय. TVS Apache RR 310S ला भारतात १.८ लाख रूपये ते २ लाख रूपये किंमतीत भारतीय बाजारात उतरवले जाऊ शकते.