ट्विटरने लॉन्च केले नवीन फीचर...

सोशल नेटवर्किंग वेबसाईट ट्विटरने यूजर्ससाठी ए्क नवीन सुविधा सुरू केली आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 24, 2017, 07:31 PM IST
ट्विटरने लॉन्च केले नवीन फीचर... title=

न्यूयॉर्क : सोशल नेटवर्किंग वेबसाईट ट्विटरने यूजर्ससाठी ए्क नवीन सुविधा सुरू केली आहे. या आधी ट्विटरने ट्विट करण्यासाठी शब्दमर्यादा वाढवली होती. पुर्वी १४० असलेली शब्दमर्यादा आता २८० करण्यात आली आहे. ट्विटरच्या या सुविधेमुळे यूजर्स सुखावले होते. 

नवीन फीचर लॉन्च :

आता ट्विटरने अजून एक फीचर लॉन्च केले आहे. 'बुकमार्क' असे हे फीचर असून सध्या त्याचे टेस्टिंग चालू आहे. या फीचरमुळे ३० कोटींहून अधिक ट्विटर युजर्स ट्वीट पुन्हा वाचण्यासाठी सुरक्षित ठेऊ शकतात.

काय आहे फीचर ?

ट्विटरच्या उत्पादन डिजाईनर टीना कोयामा यांनी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, "सेवफॉरलेटर टीमकडून बातमी. आम्ही आमच्या सुविधेला  'बुकमार्क' हे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या शब्दाचा अर्थ आहे सामग्री सुरक्षित ठेवणे. त्यामुळे हव्या असलेल्य़ा गोष्टी चटकन मिळतात."

कोयामा यांनी सांगितले की, "ट्विटर यूजर्सकडून केल्या गेलेल्या मागणीपैकी ही एक आहे."