कॉफी पावडर-मध लावून तासाभरात चेहरा गोरा-गोरा?

Last Updated: Sunday, August 13, 2017 - 10:41

मुंबई : पी हळद हो गोरी, ही म्हण आता मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण काही दिवसापूर्वी इनो लावल्याने काही मिनिटात तुमचा रंग गोरा होऊ शकतो, असा दावा करणारा व्हिडीओ ट्रेन्ड होत होता. आता कॉफी पावडर आणि मध एकत्र मिसळून लावल्याने चेहरा गोरा होतो असा व्हिडीओ ट्रेन्ड होत आहे.

आता लाव इनो हो गोरी, नाही तर लाव कॉफीपावडर, मध हो गोरी, अशी मॉडर्न म्हण, उदयास आली तर आश्चर्य वाटायला नको.

काही दिवसापूर्वी तासाभरात चेहरा गोरा करण्यासाठी तुम्ही इनो वापरून चेहऱ्यांचा रंग गोरा करू शकतात, असा व्हिडीओ पाहिला होता, मात्र आता पुन्हा एक नवीन व्हिडीओ यूट्यूबवर ट्रेन्ड करतोय, यात कॉफी पावडर आणि मध वापरून चेहरा कसा गोरा करता येईल असा दावा करणारा व्हिडीओ यूट्यूबवर ट्रेन्ड करतोय.

चेहऱ्यातील बारीक छिद्रे हे द्रावण वापरल्याने मोकळे होत असल्याचा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे. मात्र झी मीडिया असा कोणताही दावा करत नाही, हा व्हिडीओ ट्रेन्ड होत आहे. यातील कोणताही प्रयोग करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published: Sunday, August 13, 2017 - 10:41
comments powered by Disqus