भारतातही लॉन्च झालं व्हॉट्सअ‍ॅपचं 'बिझनेझ अ‍ॅप'

आजकाल 'व्हॉट्सअ‍ॅप'चा वापर आबालवृद्धांना एकमेकांशी कनेक्ट ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Jan 24, 2018, 09:38 AM IST
भारतातही लॉन्च झालं व्हॉट्सअ‍ॅपचं 'बिझनेझ अ‍ॅप'  title=

मुंबई : आजकाल 'व्हॉट्सअ‍ॅप'चा वापर आबालवृद्धांना एकमेकांशी कनेक्ट ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.

आता भविष्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपचं बिजनेस अ‍ॅप युजर्ससाठी खुलं करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी भारताबाहेर लॉन्च करण्यात आलेलं हे बिझनेस अ‍ॅप आता भारतामध्येही दाखल झालं आहे. सध्या अ‍ॅन्ड्रॉईड युजर्ससाठी हे अ‍ॅप खुलं करण्यात आलं आहे. गूगल प्लेस्टोअरमधून तुम्ही हे अ‍ॅप डाऊनलाऊड करू शकता. नव्या अ‍ॅपमुळे व्यापारी ग्राहकांशी थेट बोलू शकणार आहेत.  

कसं आहे व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅप  ? 

व्हॉट्स अ‍ॅपचं नवं बिझनेझ अ‍ॅप छोट्या व्यावसायिकांसाठी आहे. हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे. या अ‍ॅपमुळे ग्राहक आणि व्यापारीमध्ये संवाद होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या 1.3 अरब युजर्सना व्यावसायिकांसोबत चॅटिंग करणं सुकर होणार आहे.  रेग्युलर व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना नव्या अ‍ॅपला डाऊनलोड करण्याची गरज नाही.  

फीचर्स काय ? 

अ‍ॅपमध्ये मोबाईल क्रमांकासोबत लॅन्डलाईननंबरही वापरता येऊ शकतो. लॅन्डलाईन टाकल्यानंतर तुम्ही कॉल करू शकणार नाहीत. नंबर टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन कॉल येईल त्यानंतर तुम्हांला बिझनेस कॅटॅगरी निवडावी लागेल. 

कोणकोणत्या देशात सोय  ? 

व्हॉट्सअ‍ॅपचं बिझनेझ अ‍ॅप इंडोनेशिया, इटली, युके, युएस या देशांमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे.  व्हॉट्सअ‍ॅपचं नवं अ‍ॅप डेस्कटॉपवरही उपलब्ध आहे.